काकड-आरती
kakad-aarti
|| काकड आरती ||
काकड आरती: देवाची पहाटेची स्तुती-
काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला पहाटे जागवण्यासाठी करण्यात येणारी आरती आहे. या आरतीच्या वेळी देवाच्या मूर्तींवर काकडयाने, म्हणजेच एक विशिष्ट प्रकारच्या ज्योतीने, ओवाळले जाते. याच कारणास्तव या आरतीला “काकड आरती” असे नाव देण्यात आले आहे.
भारतातील अनेक मंदिरांमध्ये या आरतीची पद्धत प्रचलित आहे, विशेषतः महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये, जिथे ती नियमितपणे किंवा विशेष प्रसंगांवर, विशेषतः कार्तिक महिन्यात, केली जाते. काकड आरती ही भक्तांच्या श्रद्धेची आणि भक्तिभावाची प्रतीकात्मक अभिव्यक्ती आहे, ज्यामुळे देवाच्या चरणी भक्तांचे मन ओतप्रोत श्रद्धा व प्रेमाने भरले जाते.
विशेषतः कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून ते त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत, दररोज पहाटे देवाला जागविण्यासाठी काकड आरती करण्याची परंपरा चालू आहे. आरतीच्या उपरांत, विविध भजने, इतर आरती आणि स्तोत्रे म्हटली जातात, ज्यामुळे भक्तांना आध्यात्मिक आनंद आणि शांती मिळते. कृष्णाच्या लीला वर्णन करणाऱ्या गीतेही या आरतीमध्ये सामाविष्ट केल्या जातात, ज्यामुळे ती अधिक गहन आणि भक्तिपूर्ण होते.
संत तुकाराम, संत रामदास, संत एकनाथ यांसारख्या महान संतांनी काकड आरती रचल्या आहेत. त्यांच्या रचनांमध्ये भक्तिपूर्ण भावनांचा अनुभव घेता येतो, ज्यामुळे काकड आरतीला एक विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. काकड आरती म्हणजे एक साधा अनुष्ठान नसून, ती भक्तांच्या मनातील श्रद्धा, प्रेम, आणि एकता दर्शवते, ज्यामुळे ती प्रत्येक भक्तासाठी अद्वितीय ठरते.
अशा प्रकारे काकड आरती ही हिंदू धर्मातील एक महत्वपूर्ण परंपरा आहे, जी भक्तांना देवाच्या प्रेमाची, कृपेची आणि आशीर्वादाची अनुभूती देते.

भूपाळी
जोडूनियां कर चरणीं ठेविला माथा । परिसावी विनंती माझी सदुरुनाथा ।। 1 ।।
असो नसो भाव आलों तूझिया ठाया । कृपादृष्टीं पाहें मजकडे सदुरुया ।। 2 ।।
अखंडित असावें ऐसें वाटतें पायी । सांडूनी संकोच ठाव थोडासा देईं ।। 3 ।।
तुका म्हणे देवा माझी वेडीवांकुडी । नामें भवपाश हातीं आपुल्या तोड़ी ।। 4 ।।
भूपाळी
उठा पांडुरंगा आतां प्रभातसमयो पातला । वैष्णवांचा मेळा गरुडपारीं दाटला ।। 1 ।।
गरुडपारापासुनी महाद्घारापर्यंत । सुरवरांची मांदी उभी जोडूनियां हात ।। 2 ।।
शुकसनकादिक नारद-तुबंर भक्तांच्या कोटी । त्रिशूल डमरु घेउनि उभा गिरिजेचा पती ।। 3 ।।
कलीयुगींचा बक्त नामा उभा कीर्तनीं । पाठीमागें उभी डोळा लावुनियां जनी ।। 4 ।।
भूपाळी
उठा उठा श्री साईनाथ गुरु चरणकमल दावा । आधिव्याधि भवताप वारुनी तारा जडजीवा ।। ध्रु ।।
गेली तुम्हां सोडुनियां भवतमरजनी विलया । परि ही अज्ञानासी तुमची भलवि योगमाया ।
शक्ति न आम्हां यत्किंचितही तिजला साराया । तुम्हीच तीतें सारुनि दावा मुख जन ताराया ।। चा।।
भो साइनाथ महाराज भवतिमिरनाशक रवी । अज्ञानी आम्ही किती तव वर्णावी थोरवी ।
ती वर्णितां भागले बहुवदनि शेष विधि कवी ।। चा ।।
सकृप होउनि महिमा तुमचा तुम्हीच वदवावा ।। आधि।। उठा ।। 1 ।।
बक्त मनीं सद्घाव धरुनि जे तुम्हां अनुसरले । ध्यायास्तव ते दर्शन तुमचें द्घारि उभे ठेले ।
ध्यानस्था तुम्हांस पाहुनी मन अमुचें धालें । परि त्वद्घचनामृत प्राशायातें आतुर झालें ।। चा ।।
उघडूनी नेत्रकमला दीनबंधु रमाकांता । पाहिं बा कृपादृष्टीं बालका जशी माता ।
रंजवी मधुरवाणी हरीं ताप साइनाथा ।। चा ।।
आम्हीच अपुले काजास्तव तुज कष्टवितों देवा । सहन करिशिल तें ऐकुनि घावी भेट कृष्ण धांवा ।। उठा उठा0 ।। आधिव्याधि ।। 2 ।।
भूपाळी
उठा पांडुरंगा आतां दर्शन घा सकळां । झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ।। 1 ।।
संत साधू मुनी अवघे झालेती गोळा । सोडा शेजे सुख आतां बंघु घा मुखकमळा ।। 2 ।।
रंगमंडपी महाद्घारीं झालीसे दाटी । मन उतावीळ रुप पहावया दृष्टी ।। 3 ।।
राही रखुमाबाई तुम्हां येऊं घा दया । शेजे हालवुनी जागें करा देवराया ।। 4 ।।
गरुड हनुमंत उभे पाहती वाट । स्वर्गीचे सुरवर घेउनि आले बोभाट ।। 5 ।।
झालें मुक्तद्घार लाभ झाला रोकडा । विष्णुदास नामा उभा घेऊनि कांकाड़ा ।। 6 ।।
अभंग
घेउनियां पंचारती । करुं बाबांसी आरती ।। करुं साई सी ।। 1 ।।
उठा उठा हो बांधव । ओंवाळूं हा रमाधव ।। सांई र।। ओं ।। 2 ।।
करुनीयां स्थीर मन । पाहूं गंभीर हें ध्यान ।। साईंचें हें।। पा। 3 ।।
कृष्णनाथा दत्तसाई । जडो चित्त तुझे पायीं ।। साई तु।। जडो ।। 4 ।।
कांकड आरती
कांकड आरती करीतों साईनाथ देवा । चिनमयरुप दाखवीं घेउनि बालक-लघुसेवा ।। ध्रु ।।
काम क्रोध मद मत्सर आटुनी कांकडा केला । वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजवीला ।
साईनाथगुरुभक्तिज्वलनें तो मी पेटविला । तद्वृत्ती जाळुनी गुरुनें प्रकाश पाडिला ।
द्घेत-तमा नासूनी मिळवी तत्स्वरुपीं जीवा ।। चि।। 1 ।।
भू-खेचर व्यापूनी अवघे हृत्कमलीं राहरसी । तोचि दत्तदेव तू शिरड़ी राहुनी पावसी ।
राहुनि येथे अन्यत्रहि तू भक्तांस्तव धांवसी । निरसुनियां संकटा दासा अनुभव दाविसी ।
न कळे त्वल्लीलाही कोण्या देवा वा मानवा ।। चि ।। 2 ।।
त्वघशदुंदुभीनें सारें अंबर हेंकोंदलें । सगुण मूर्ति पाहण्या आतुर जन शिरडी आले ।
प्राशुनि त्वद्घचनामृत अमुचे देहभान हरपलें । सोडूनियां दुरभिमान मानस त्वच्चरणीं वाहिले ।
कृपा करुनियां साईमाउले दास पदरिं ध्यावा ।। चि ।। कां || चि ।। 3 ।।
कांकंड आरती ( पंढरीनाथा )
भक्तीचिया पोटीं बोध कांकडा ज्योती । पंचप्राण जीवें भावें ओवाळूं आरती ।। 1 ।।
ओंवाळूं आरती माइया पंढरीनाथा माझ्या साईनाथा । दोन्ही कर जोडोनी चरणीं ठेविला माथा ।। ध्रु ।।
काय महिमा वर्णूं आतां सांगणे किती । कोटी ब्रहमहत्या मुख पाहतां जाती ।। 2 ।।
राही रखुमाबाई उभ्या दोघी दो बाहीं । मयूरपिच्छ चामरें ढाळिति ठायींचे ठायीं ।। 3 ।।
तुका म्हणे दीप घेउनि उन्मनीत शोभा । विठेवरी उभा दिसे लावण्यगाभा ।। 4 ।। ओवाळूं ।।
पद (उठा उठा)
उठा साधुसंत साधा आपुलालें हित । जाईल जाईल हा नरदेह मग कैंचा भगवंत ।। 1 ।।
उठोनियां पहांटे बाबा उभा असे विटे । चरण तयांचे गोमटे अमृतदृष्टि अवलोका ।। 2 ।।
उठा उठा हो वेगेंसीं चला जाऊंया राइळासी । जळतिल पातकांच्या राशी कांकंडआरती देखिलिया ।। 3 ।।
जागें करा रुक्मिणीवर, देव आहे निजसुरांत । वेंगें लिंबलोण करा दृष्ट होईल तयासी ।। 4 ।।
दारीं वाजंत्रीं वाजती ढोल दमामे गर्जती । होते कांकडआरती माइया सदगरुरायांची ।। 5 ।।
सिंहनाद शंखभेरी आनंद होतो महाद्घारी । केशवराज विटेवरी नामा चरण वंदितो ।। 6 ।।
भजन
साईनाथगुरु माझे आई । मजला ठाव घावा पायीं ।।
दत्तराज गुरु माझे आई । मजला ठाव घावा पायीं ।।
श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज क जय ।।
|| श्री सांईनाथ प्रभाताष्टक ||
प्रभातसमयीं नभा शुभ रवि प्रभा फांकली । स्मरे गुरु सदा अशा समयिं त्या छळे ना कली ।।
म्हणोनि कर जोडूनी करुं अतां गुरुप्रार्थना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 1 ।।
तमा निरसि भानु हा गुरुहि नासि अज्ञानता । परन्तु गुरुची करी न रविही कधीं साम्यता ।।
पुन्हां तिमिर जन्म घे गुरुकृपेनि अज्ञान ना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 2 ।।
रवि प्रगट होउनि त्वरित घालवी आलसा । तसा गुरुहि सोडवी सकल दुष्कृतीलालसा ।।
हरोनि अभिमानही जडवि तत्पदीं भावना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 3 ।।
गुरुसि उपमा दिसे विधिहरीहरांची उणी । कुठोनि मग येई ती कवनिं या उगी पाहुणी ।।
तुझीच उपमा तुला बरवि शोभते सज्जना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 4 ।।
समाधि उतरोनियां गुरु चला मशीदीकडे । त्वदीय वचनोक्ति ती मधुर वारिती सांकडें ।।
अजातरिपु सदगुरु अखिलपातका भंजना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 5 ।।
अहा सुसमयासि या गुरु उठोनियां बैसले । वोलोकुनि पदाश्रिता तदिय आपदे नासिलें ।।
असा सुहितकारि या जगतिं कोणिही अन्य ना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 6 ।।
असे बहुत शाहणा परि न ज्या गुरुची कृपा । न तत्स्वहित त्या कळे करितसे रिकाम्या गपा ।।
जरी गुरुपदा धरी सुदृढ़ भक्तिने तो मना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 7 ।।
गुरो विनति मी करीं हृदयमंदिरीं या बसा । समस्त जग हें गुरुस्वरुपची ठसो मानसा ।।
घडो सतत सत्कृती मतिहि दे जगत्पावना । समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 8 ।।
स्रग्धरा
प्रेमें या अष्टकासी पढुनि गुरुवरा प्रार्थिती जे प्रभातीं ।
त्यांचे चित्तासि देतों अखिल हरुनियां भ्रांति मी नित्य शांती ।।
ऐसें हें साईनाथें कथुनि सुचविलें जेविं या बालकासी ।
तेवीं त्या कृष्णपायीं नमुनि सविनयें अर्पितों अष्टकासी ।। 1 ।।
श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय ।।
पद
सांई रहम नजर करना, बच्चों का पालन करना ।। धु ।।
जाना तुमने जगत्पसारा, सबही झूठ जमाना ।। साई।। 1 ।।
मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझको प्रभु दिखलाना ।। साई ।। 2 ।।
दास गनू कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना ।। साई।। 3 ।।
पद
रहम नजर करो, अब मोरे साई, तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई ।। धु।।
मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा ।। मैं ना जानूं अल्लाइलाही ।। 1 ।।
खाली जमाना मैंने गमाया, साथी आखिर का किया न कोई ।। 2 ।।
अपने मस्जिद का झाडू गनू है । मालिक हमारे, तुम बाबा साई ।। 3 ।।
पद
तुज काय देऊं सावळ्या मी खाया तरी, मी दुबली बटिक नाम्याची जाण श्रीहरी ।
उच्छिष्ट तुला देणें ही गोष्ट ना बरी, तूं जगन्नाथ, तुज देऊँ कशी रे भाकरी ।
नको अंत मदीय पाहूं सख्या भगवंता । श्रीकांता ।
माध्यान्हरात्र उलटोनि गेली ही आतां । आण चित्ता ।
जा होईल तुझा रे कांकडा ही राउळांतरीं । आणतील भक्त नैवेघ हीनानापरी ।।
पद
श्री सदगुरु बाबासाई तुजवांचुनि आश्रय नाही, भूतली ।। धु।।
मी पापी पतित धीमंदा । तारणें मला गुरुनाथा, झडकरी ।। 1 ।।
तूं शांतिक्षमेचा मेरु । तूं भवार्णवींचें तारुं, गुरुवरा ।। 2 ।।
गुरुवरा मजसि पामरा, अता उद्घरा, त्वरित लवलाही, त्वरित लवलाही,
मी बुडतों भवभय डोही उद्घरा ।। श्री सदगुरु ।। 3 ।।
