srikshetra-antapur
|| तीर्थक्षेत्र ||
सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या जन्मगावी, अंतापूर येथे एक अद्वितीय मंदिर स्थित आहे. या मंदिरातील गर्भगृहात श्री शंकर महाराजांच्या मूर्तीसह शिवलिंग स्थापन करण्यात आले आहे. गर्भगृहाच्या उजव्या बाजूस, श्री शंकर महाराजांनी भूमीतील मूळातून उचललेली श्री गणेश मूर्ती, शिवलिंग आणि नंदी या मूर्त्या स्थापण्यात आले आहेत.
मंदिराच्या समोरील भागात, स्वतंत्रपणे, एक छोटं मंदिर असून त्यात मारुतीराया विराजमान आहेत. वर्तमान मंदिराच्या गर्भगृहाच्या डाव्या बाजूस एक प्राचीन चिंच होती, ज्याच्या मुळाशी श्री गणेश, नंदी आणि श्री मारुती यांची मूर्त्या सापडली आहेत. हा प्रसंग अत्यंत विशेष मानला जातो.
एकदा, महाराजांचे अंतापूरमधील वंशज गोविंद हिरे यांना श्री शंकर महाराजांनी सांगितले, “चल, तुला डबोल देतो.” हे ऐकून गोविंद हिरे अत्यंत आनंदित झाले, कारण ‘डबोल’ म्हणजे मोठा लाभ आणि दारिद्र्याची समाप्ती असा त्यांचा विश्वास होता. त्यांनी महाराजांसोबत चलण्याचा निर्णय घेतला आणि काही गावकरीही त्यांच्या सोबत आले. महाराजांनी सर्वांना चिंचेखाली खणण्याचे निर्देश दिले. खणण्याच्या काही फुटांवरच मूर्त्या सापडल्या.
गोविंद हिरेंना अपेक्षित डबोल मिळाले नाही, परंतु देवता मूर्त्या सापडल्याने सर्वजण आनंदित झाले. मूर्त्या उचलण्याचा प्रयत्न सुरू झाला, पण मारुतीरायाची मूर्ती सहजपणे बाहेर येत नव्हती. त्या मूर्तीस दोरखंड बांधून दोन रेड्यांसोबत खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण मूर्ती स्थिरच होती. महाराज, स्वानंदमग्न अवस्थेत, मूळेतून पुढे आले आणि त्यांनी मूर्तीकडे फक्त आपल्या अंगुलीने स्पर्श केला. त्याच क्षणी, श्री मारुतीराया सहजपणे खड्याबाहेर आला आणि इतर मूर्त्याही श्री शंकर महाराजांच्या स्पर्शाने सहजपणे बाहेर निघाल्या.