श्रीराम-आरती

उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी । लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी ।
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह अहंभाव रावण निवटोनी ।। १ ।।

जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थे आरती, सद्‍भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ ।।

प्रथम सीताशोधा हनुमंत गेला । लंका दहन करुनी अखया मारिला ।
मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला । आनंदाची गुढी घेऊनिया आला ।। २ ।।

shri-ram-aarti

निजबळे निजशक्ति सोडविली सीता । म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा ।
आनंदे ओसंडे वैराग्य भरता । आरती घेऊनी आली कौसल्यामाता ।। ३ ।।

अनाहतध्वनि गर्जती अपार । अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ।
अयोध्येसी आले दशरथकुमार । नगरीं होत आहे आनंद थोर ।। ४ ।।

सहजसिंहासनी राजा रघुवीर । सोऽहंभावे तया पूजा उपचार ।
सहजांची आरती वाद्यांचा गजर । माधवदास स्वामी आठव ना विसर ।। ५ ।।