shree-dattastavstotra
|| श्री दत्तस्तवस्तोत्र ||
संसार आणि अध्यात्म यात यश मिळवायचे असेल, तर सर्वप्रथम मनाची एकाग्रता साधणे अत्यंत गरजेचे आहे. मन स्थिर नसेल, तर अभ्यास किंवा साधना यांचा काहीही फायदा होत नाही. भक्तांच्या या अडचणीचे निराकरण करण्यासाठी परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी श्रीदत्तगुरूंना चित्त स्थिर करण्यासाठी या स्तोत्राद्वारे प्रार्थना केली आहे.

श्री दत्तस्तवस्तोत्र
अनसूयात्रिसंभूत दत्तात्रेय महामते ।
सर्वदेवाधिदेवत्वं त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ।।
शरणागतदीनार्थतारकाsखिलकारक ।
सर्वचालक देव त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ।।
सर्वमंगलमांगल्य सर्वाधिव्याधिभेषज ।
सर्वसंकटहारिन् त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ।।
स्मर्तुगामी स्वभक्तानां कामदो रिपुनाशनः ।
भुक्तिमुक्तिप्रदः स त्वं मम चित्तं स्थिरीकुरू ।।
सर्वपापक्षयकरस्तापदैन्यनिवारणः ।
योsभिष्टदः प्रभुः स त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ।।
य एतत्प्रयतः श्लोकपंचकं प्रपठेत्सुधीः ।
स्थिरचितः स भगवत्कृपापात्रं भविष्यति ।।
।। इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितं श्री दत्तात्रेय स्तोत्रं संपूर्णम् ।।
कोणत्याही कार्यात यश प्राप्त करायचे असेल, तर मन शांत आणि एकाग्र असणे अत्यंत आवश्यक आहे. मनात उगाच येणारे असंख्य विचार नियंत्रित करणे ही खूपच कठीण बाब आहे. अनावश्यक विचार मनात येऊ नयेत, अशी इच्छा असते; पण त्यासाठी प्रयत्न केले, तरी ते विचार दुप्पट ताकदीने परत येतात.
अशावेळी साधकाची अवस्था बिकट होते. मानवी प्रयत्न करतो खरा, पण त्यालाही मर्यादा असतात. शेवटी, मनाला शांती आणि आनंद मिळण्यासाठी ईश्वरी कृपेची गरज असते. ही दैवी कृपा मिळवण्यासाठी परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी साधकांना या स्तोत्ररूपी साधनाचा मार्ग दाखवला आहे.
विश्वाची निर्मिती, संरक्षण आणि लय सांभाळणाऱ्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे एकरूप असलेल्या श्रीदत्तात्रेयांचीच या हृदयस्पर्शी स्तोत्रातून प्रार्थना केली आहे. “हे दत्तगुरू, माझे अत्यंत चंचल मन स्थिर कर,” अशी ही आळवणी आहे. साधकांनी आपल्या दैनंदिन उपासनेत या प्रार्थनेचा समावेश अवश्य करावा, स्वामी महाराजांच्या या अप्रतिम रचनेचा आनंद घ्यावा आणि आपले जीवन सुखमय करावे.