सावता महाराजांची-आरती
savata-maharajchi-aarti
|| श्री संत शिरोमणी सावता महाराजांची आरती ||
जय संता जय भक्ता ।जय सावत्या श्रेष्ठा ।
अगाध ज्ञान तुझे ।थोर प्रतापी वरिष्ठा ॥1॥ धृ.॥
माळियाचे वंशी । घेऊनिया अवतार ।
सकळिकांचा पूर्णपणे केला त्वा उध्दार ॥ 2 ॥ जय संता जय
संपूर्ण भक्तज्ञान । सकल वेद सार ।

देव त्वा साठविला । चिरूनिया उदर ।॥3॥ जय संता जय
देवे तुज गौरविले । जन्मोजन्मी साह्य केले।
दुर्जने तुज जासिले । ते दैव फजित झाले ॥ 4॥ जय संता जय
वश्वरूप बोध ठेवा । काशिबाशी दिधला ।
सकल संता भक्तभाव ।गृहस्था श्रमी दाविला ॥5॥ जय संता जय संता
पूर्ण ज्ञानी जीवन्मुक्त । भक्तिज्ञान विसावा ।
आरणी दाखाविला । पुर्ण पाविञ ठेवा ॥6॥ जय संता जय
भिकू शरण आला तुज । पुर्ण अनन्य भावा ।
जागृत महिमा दावोनी । व्यक्त केला नीज ठेवा ॥7॥ जय संता जय