sant-namdev-payri
संत नामदेव समाधी (पंढरपुर)–
संत नामदेव हे ८० वर्षांचे झाल्यानंतर त्यांनी जग सोडून जाण्याचे ठरवले. आषाढ शुद्ध एकादशी शके १२७२ रोजी विठ्ठला पुढे जाऊन आज्ञा द्यावी अशी विनंती केली. त्यानंतर आषाढ वद्य त्रयोदशी शके १२७२ या दिवशी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी समाधी घेतली. विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या सर्व संत सज्जनांची धूळ आपल्या मस्तकी लावावी ही त्यांची इच्छा असल्यामुळे महाद्वाराच्या पहिल्या पायरीवर ते समाधिस्थ झाले .तेथे त्याचे समाधी स्थान तयार करण्यात आले आहे. पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात संत नामदेव पायरी आहे.
संत नामदेव मंदिर (नरसी)–
संत नामदेव यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यापासून १५ ते २० किमी दूर नरसी या गावात झाला . या गावाशेजारुन कयाधू नदी वाहते. त्या नदीकाठी संत नामदेवांचे मंदिर आहे.