संत मुक्ताबाई-आरती
sant-muktabai-aarti
|| संत मुक्ताबाई-आरती ||
जयदेवी जयदेवी जय मुक्ताबाई ।।
आदिमाते जननी वादन तवपाई ।।धृ.।।
ब्रह्मा, विष्णू , शिव रूपसी आले ।
निवृती सोपान ज्ञान प्रगटले ।
भगीनी मुक्ताई ब्रह्म चित्कले ।
अवतार धरुनी जग उद्धरीले ।। १ ।।
तापी तटाकवासी श्री चांगदेव ।
ज्ञान बोधुनी त्यासी दिधले वैभव ।
योग्याची ती उर्मी निरसोनी सर्व ।
माया मिथ्था दावी नित्य स्वंयमेव ।। २ ।।
निरंजनी विज कडाडली पाही ।
मनुजेचे तिरी अदृश्य होई ।
जलधारा स्वरूपे वाहे तव ठायी ।
तेथे अधिष्ठान झाली मुक्ताबाई ।। ३ ।।