sant-limbai-abhang
अभंग, संत लिंबाई
तारी मज आतां रखुमाईच्या कांता पंढरीच्या नाथा मायबापा ॥१॥

अनाथाचा नाथ ऐकियेलें कानीं । सनकादिक मुनी बोलताती ।।२।।
त्याचिया वचनाचा पावोनी विश्वास धरिली तुझी कांस पांडुरंगा ॥३॥
नामयाची लेकी लिंबाई म्हणे देवा । कृपाळू केशवा सांभाळावें ||४||