अभंग,संत जनाबाई अभंग – हरिश्चंद्र आख्यान
sant-janabai-abhnag-harischandra-akhyana
|| संत जनाबाई – हरिश्चंद्र आख्यान ||
२९५
अपूर्व कोणे एके काळीं । देव सभेच्या मंडळी ।।१।।
करी त्रैलोक्यभ्रमणा । करीं वाहे ब्रह्मवीणा ॥२॥
देती सर्वही सन्मान | सिद्ध साधू योगी जन ।। ३ ।
सांगे अपूर्व कहाणी म्हणे नामयाची जनी ॥४॥
२९६
नारद सांगे मृत्युलोकीं। हरिश्चंद्र पुण्यश्लोकी ।।१।।
कैसा सत्त्वाचा समुद्र। ऐसा नाहीं नृपवर ||२||
नारदाची ऐकून गोष्ट । सुखावला तो वसिष्ठ।।३।।
कोप विश्वामित्रा आला। कैसा वाढविता शिष्याला ॥१४॥
तपतेजें सूर्यराशी छळीन म्हणे हरिश्चंद्रासी ॥५॥
उदय पश्चिमे दिनकर। सत्त्व डाळीना नृपवर ||६||
वसिष्ठाच्या ऐकुनी बोला। विश्वामित्रा क्रोध आला ||७||
जरी उतरेल माझ्या तुर्की देईन आपुल्या तपासी ||८||
ऐसा दोघांचा संवाद होता उठला नारद ||९||
इंद्र म्हणे कां निर्फळ शब्दाशब्दी वाढेल कळ ||१०||
ऐसें ऐकतां वचन जनी म्हणे केलें गमन ।।११।।
२९७
इंद्रसभे झाला बाद करूं रायासी सावध।।१।।
येरीकडे ब्रह्मऋषी । कृपें वोळला शिष्यासी ॥२॥
नवी व्याली जैसी गाय पक्षी अंडजीं झेपाय||३||
बाप माझा तैशापरी होय शिष्याचा साहाकारी ॥४॥
येऊनियां मागेल तूतें । छळ करील गाधिसुत ||५||
बापा सावध अंतरी सत्त्व ढाळील नानापरी ॥६॥
घरी श्वापदांच्या झुंडी । तुझ्या देशांत भवंडी ॥७॥
मानी शब्दाला आमुच्या बना न जायें ऋषींच्या ||८||
ऐसें बोलोनी रायासी । गेला वसिष्ठ तपासी ।।९।।
तुझ्या सत्त्वालागीं हानी । करूं इच्छी म्हणे जनी ॥१०॥
२९८
विश्वामित्रे तत्क्षणीं । सिद्ध आश्रमा येउनी ।।१।।
बैसे येउनी आश्रमासी करी मातंग यागासी ॥२॥
सहस्र अवदान आहुती। होतां प्रगटली शक्ति ।।३।।
विश्वामित्रे तये वेळे । देवी वरदानाचे बळें ॥४॥
व्याघ्र हिंडती रानें रानें बंद केलें येणें जाणें ॥५॥
कृपा न जाती कृषिक तीर्थयात्रेसी पांथिक ।।६।।
धेनु न जाती बनासी बाट नाहीं वेव्हारासी ||७||
प्रजा जाऊन राजसमे हात जोडोनियां उभे ॥८॥
ऐसी प्रजेची है वाणी राजा विचारितो मनीं ||९||
गुरुवचन धरिता चित्तीं माझी होईल अपकीर्ति ।।१०।।
राव निवाला स्वारीसी । म्हणे नामयाची दासी ।।११।।
२९९
नाना वाजंत्र्यांच्या ध्वनी राजा आदला बहनी ।।१।।
राव प्रवेशला बनीं। अवधी श्वापदे मारुनी ॥२॥
आश्रमी आणावासी राव। केलें ऋषीनें लाघव||३||
मृग कनकाचा साजरा आला रायाच्या सामोरा ||४||
गुणी लाविलासे बाण घेऊं पाहे त्याचा प्राण ||५||
येरु कीलान मारुनी जाय। धरणीं न देवी तो पाय ।।६।।
राव लागे तथा पाठीं दम न समाये पोटीं ||७||
प्रवेशला तये वनीं। देखे अपूर्व नयनीं ॥८॥
धेनुव्याघ्र एके स्थानी। चाटी एकमेकां दोन्ही ।। ९।।
निर्वैर श्वापदगण राव विस्मय करी देखोन ।।१०।।
पुढे जातां सुगंध पाणी राव स्नान करूनी।।११।।
भायें जिला गिरिजावर नमन केलें जोडुनी कर ||१२||
विश्वामित्रे तथा वनीं दोघी रूपसा नयनीं । ।१३।।
रायापुढे नृत्य करी दाळ विणा झणत्कारीं ।। १४ ।
द्रव्य आणविलें अपारें । राव देतो आपुल्या करें ।। १५ ।।
नाहीं द्रव्यासी कारण तुझ्या स्वरूपासी लीन।। १६ ।।
बोले मुनिवर्य दासी राजा कोपला मानसीं ।। १७।।
आज्ञा केली प्रधानासी। मारा बाहेर घाला याशी ।। १८ ।।
रक्तवदन आश्रमासी म्हणे नामवाची दासी ।। १९।।
३००
ऋषिअंगणीं कामिनी। लोळती येऊनी दोघीजणी ॥१॥
तुम्हां दिला कोणे त्रास त्याचा करीन मी ग्रास।।२।।
आम्ही बोलिलों रायासी घेत नाहीं उचितासी।।३।
।
ऐसें बोलतां वचन राव कोपला दारुण ॥४॥
केलें प्रधानें ताडण बाहेर घातलें मारून ||५||
त्यांच्या परिसोनी बोला। विश्वामित्र कोपें आला ॥६॥
म्हणे रायासी अथमा माझी प्रताप महिमा।।७॥
वसिष्ठाच्या पडिभारें मातलासी द्रव्ये बोरे ॥८॥
निर्वर श्वापदांसी। कारे मारिलें तयासी ।।९।।
वधूनियां शेवटीं त्यासी मारियेल्या तापस दासी।।१०।।
पुढें रसाळ आहे कथा । निद्रा लागेल नृपनाथा ।।११।।
स्वप्नीं मागेल दानासी म्हणे नामयाची दासी ।।१२।
३०१
विश्वामित्र द्विजचिन्ह । स्वप्नीं प्रगटे आपण ।।१।।
देखोनियां द्विजवरातें नमियेलें जोडुनी हातें ॥२॥
राव बोले उदारपणीं । काय इच्छा आहे मनीं ।। ३।।
दयावंत धर्ममूर्ती तुझी तिहीं लोकीं कीर्ति ।।४।।
अंकुश कडिया लेखणी। राया वोपी माझ्या पाणी ॥५॥
उदारपणें देसी जरी उदक घालीं माझे करीं।।६।।
कृपा करुनी आम्हांवरी। आलें पाहिजे नगरीं ।।७।।
येथें संकल्पावांचून । नाहीं होत माझें येणं ।।८।।
रायें घेऊन जीवन। ऋषिहस्तकीं घालून ||९||
एक नवल देखे दृष्टी काळपुरुष उभा पार्टी।।१०।।
लोहदंड घेउनी करीं । घालूं पाहे त्याचे शिरीं ।। ११।।
तेणें झाला भयाभीत। राव स्वप्नांत बरळत ||१२||
राव बैसला उठोन करी देवाचें स्मरण ।।१३।।
तारामती पुसे राया। कांहो बरळलां स्वामिया ||१४||
राज्यदान सुकृतकोटी । एक काळपुरुष पाठीं ।।१५।।
लोहदंड घेऊन कीं। पालूं पाहे माझे शिरी।।१६।।
ये म्हणे या जीवनीं करा स्नानातें जाउनी ।।१७।।
अग्निमुखीं द्यावें दान स्वप्नदोष नासती जाण ।।१८।।
म्हणे प्रधान महाराजा दान करा कांहीं द्विजा ।। १९।।
ऐसें बोलतां वचन आला विश्वामित्र जाण ||२०||
राजा बोले कर जोडून । शयनीं देखियेलें स्वप्न ।। २१ ।।
ह्याच स्वरूपा प्रमाण ऐसा देखिला ब्राह्मण||२२||
सिंहासन समेदिनी । राया दे गा मजलागोनि ।। २३॥
आतां मार्गे दक्षणेसी म्हणे नामयाची दासी ||२४||
३०२
ऋषि म्हणे रे समर्था असो स्वप्नींची हे वार्ता ।।१।।
इच्छा धरून आलों येथे और तुक दे कनकार्ते॥२॥
कृपा करून द्याल जरी उदक घालीं माझे करीं ॥३॥
दया करा आम्हांवरी। आलें पाहिजे नगरीं।।४।।
येथें संकल्पावांचून नाहीं होत माझें येणें ||५||
रायें घेऊनी जीवन ऋषिस्तकीं घालून ||६||
विश्वामित्र शिबिकासनीं । राव चालिला घेऊनी ।।७।।
मार्गी वाद्यांचा लाघव अयोध्येसी आला राव ॥८॥
राव प्रवेशला नगरीं । विश्वामित्र बैसला द्वारी ।।९।।
दंड पडताळूनि हातीं । लक्षियेली तारामती ।।१०।।
उभी थरथरां कांपत राजा जाणविली मात ।।११।।
राव म्हणे ऋषेश्वर। कोण्या अन्यायानें मार||१२||
केला संकल्प आम्हांसी । नाहीं दिलें दक्षणेसी ||१३||
दान न देता आम्हांसी । तूं कां गेलासी सदनासी ।।१४।।
हात बांधोनियां राया। दंडहस्ते मारी तथा ।।१५।।
तंव आला रोहिदास चरणीं ठेवी मस्तकास||१६||
येरु रक्तांवर नयन। पुसे कवणाचा कवण ।।१७।।
राव म्हणे कुळभूषण आहे आमुचा नंदन।।१८।।
राजा पाचारी भांडारी आणा कनकातें झडकरी ।। १९।।
मज दिलें राज्यदान । तेंचि घेसी तूं परतोन ॥ २०॥
छत्र मुद्रा सिंहासन। ऋषि हस्तकीं वोपून ।।२१।।
हैं तो आलें राज्यदानें और भार कनक देणें ||२२||
धनवंत सौदागर उभे रायाचे समोर ।।२३।।
धन देतो जी अपार सोडा रायाला सत्वर ।। २४ ।।
विश्वामित्र म्हणे त्यांसी । काय करावें द्रव्यासी।।२५।।
क्षितिवरी जितके धन तेहि माझेच संपूर्ण ।। २६ ।।
नाहीं कोणाचा उपाव । जनी म्हणे रक्षील देव ||२७||
३०३
राव म्हणे अहो ऋषि काशीखंड वाराणसी ।।१।।
तेथे जाऊनियां आम्ही ऋण फेडूं तुमचे स्वामी॥२॥
एक मासाची अवधी तुम्ही द्यावी कृपानिधी ॥३॥
ऋषि म्हणे खरें बोला। नातरी शापीन तिघांला ॥४॥
रोहिदास म्हणे त्यासी गहाण राहीन तुम्हांपाशीं ॥५॥
पितृवचनाचे ऋण त्यांचा उतराई होईन । ||६||
ऋण हत्या आणि वैर। नाहीं चुकत मेल्यावर ।।७।।
ऐसी बाळकाची वाणी ऐकूनि दचकला मनीं ॥८॥
ऋषि बोलला नृपासी नको राहूं आमुचे देशीं ।।९।।
निधे निधे त्यासी म्हणे बाहेर आली तिघेजणें ।। १० ।।
वन निघाला त्वरित। झाला लोकांचा आकांत ।। ११ ।।
लोट पूर जाती पळा नेत्रीं उदक ढळढळां ।। १२ ।।
कैसा ब्राह्मण पहा हो। नृपचंद्रालागीं राहो।।१३।।
राजा बाहेर दवडूनी पाहे आमुचाचि धणी ।।१४।।
नगरलोकांसी फिरवुनी । राव निघाला तेथुनी ।।१५।।
अलंकार देखियेला मार्गे विश्वामित्र आला ।। १६ ।।
माझ्या राज्यांतील संपत्ती। तारामती धरिली हातीं । । १७।।
घेई भूषण उतरोनि। म्हणे नामयाची जनी ।। १८ ।।
३०४
विश्वामित्रें जाऊनि पुढें। वणवा लाविला चहूंकडे ।।१।।
धूम्र दाटलें अंबर। ज्वाळा येती भयंकर ।।२।।
विश्वामित्रे काय केलें । राया बाळातें चुकविलें ॥३॥
दोघे न पडती दृष्टी होवोनियां परम कष्टी ||४||
म्हणे अहा कटकटा काय लिहिलें अदृष्टश ||५||
मेले वणव्यांत जळोनी ऐसें आलें तिचे मनीं ॥६॥
पिटीलल्लाट करतळें। अंग टाकी धरणीं लोळे।।७।।
म्हणे बाळा रोहिदासा । भेट देई गा पाडसा ||८||
सूर्यवंशी चुडारत्ना । प्राणपति गा निधाना।।९।।
राव दृष्टि न पडतां अग्नि खाईन तत्त्वतां ।।१०।।
ऐसें विचारिलें मनीं । म्हणे नामयाची जनी ।। ११ ।।
३०५
धर्मशिळे आली राणी ऋषि दचकला मनीं ।। १।।
अनि विझवोनीं अंगें। सतीपुढे आला रागें ॥ २ ॥
म्हणे कवणाची कवण | अग्नि खासी कवण्या गुणें ||३||
येरी म्हणे पांथिकातें। पति बाळ चुकलें मातें ।।४।।
तुम्हीं असतील देखिलें मज सांगा जी पहिले ||५||
ऋषि बोले लागून मेले अग्नीत जळून ||६||
तारामती नेउनी तेथे दाखविलीं दोन्हीं प्रेतें ।।७।।
त्वचा अंगीची जळाली हात पाय गोळा झालीं।।८।।
देखे नृपाचें तें मढ़ें। पाहे वल्लभा मजकडे ।।९।।
रुसूं नका बोला वेगें। गुजगोष्टी मजसंगें ॥१०॥
रोहिदास कवळी पोटीं । लावी लल्लाट लल्लाटी ।।११।।
शोक करी तारामती अस्त झाला तो गमस्ती ।।१२।।
प्रेत कवळी कां निर्फळ गेला गेला हंसनीळ ॥१३॥
आतां प्राप्त झाली निशी व्याघ्र भक्षील तिघांसी ।। १४ ।।
सति पुढोनियां प्रेत नेलें ओढोनी परत ।। १५ ।।
उदर फोडोनी त्वरित । टाकियेलें काढुनी आर्त ।।१६।।
रामें गुरगुरी तो जाणा। भय दावी क्षणक्षणां ।। १७।।
येरी नेत्र झांकियेले पंचप्राण आकर्षिले ||१८||
तारामती सांडील प्राण । लटिकें प्रतिज्ञा वचन ।।१९।।
पतिपुत्र दोघेजण आला घेउनी ब्राह्मण ॥२०॥
नाहीं व्याघ्र ना वणवा । मृगजळाचा हेलावा ।। २१ ।।
तिघेंजर्णे एक झालीं। दासी जनी आनंदली ॥२२॥
३०६
पंथ क्रमितां तिघांसी। आडवा आला कपटवेषी।।१।।
होवोनियां वृद्ध विप्र हात काठी भार्याकुमर ||२||
म्हणे धन्य रे नृपेशा । तुझा कीर्तिघोष ठसा ||३||
भेरी गर्जती त्रिभुवनीं धांवून आलों मी ऐकुनी ||४||
आज्ञा करावी जी स्वामी तुमचे शरणागत आम्ही ॥५॥
करुणा दाखवी रायासी दीन आम्ही तीर्थवासी ॥६॥
पुढें प्रवास कठीण । पायीं नाहीं पायतण ॥७॥
तिघां वोपोनियां जोडे। जनी म्हणे जाती पुढें ||८||
३०७
आज्ञा करुनी सूर्यासी । तपवी द्वादश कळेसी।।१।।
बाप तपाच्या सामध्ये आज्ञा वंदिली आदित्यै॥२॥
पर्वताच्या लाह्या होती असा प्रकाशला गमस्ती||३||
रोहिदास म्हणे तात बहू झालों तृषाक्रांत ॥४॥
भाकितसे हो करुणा सत्वर मेळवीं जीवना ॥ ५॥
प्राप्त न होतां जरी तोय जीव माझा जाऊं पाहे॥६॥
बाळ कडे घेऊनियां। पैल दिसे तेथें छाया ॥७॥
उदक प्राशन करुनी पंथ क्रमूं म्हणे जनी ॥८॥
३०८
पुढे जातां कष्ट प्रेम निर्मी पोह्याचा आश्रम ।।१।।
धर्मपोहेची कुसरी शोभा रमणीय साजिरी ||२||
वृक्ष लागले अंबरी । डोलताती नानापरी ।।३।।
फणस कर्दळी गंभेरी आंबे नारळ खजुरी ॥४॥
चिंचा पपया जंभळी गुंज खिरण्या रायकेळी ||५||
सीताफळें कवठें निंब बोरें परीच्या दाळिंब ॥६॥
जाई मोगरा सेवंनी चांपा बकुल मालती ।।७।।
पारिजातक हे चमेली झेंडू गुलबास मखमली||८||
तुळसी मंजु शोभती नानापरी पुष्पजाती।।९।।
प्राप्त वसंताचा काळ मधु कुंती कोकिल।।१०।।
रंभा ऐसा देवांगना सर्व शृंगारी भूषणा ।।११।।
बेलवाळा तोयें सारी उभ्या तिष्ठताती द्वारीं।।१२।।
सुगंध वनीं शीतल जळ । ऐसें शोभे रम्य स्थळ ||१३||
ऐसी देखोनी वाटिका। चोज नाहीं नृपनायका ।।१४।।
म्हणती हे धर्मपथे जनी म्हणे पुढे जाये ।।१५।।
३०९
पोई अव्हेरितां राये मार्गे ऋषि धांवताहे ।।१।।
धन्य धन्य रे नरेंद्रा हातीं धरीं हरिश्चंद्रा ॥२॥
उष्ण न ध्यानीं कहार मार्गी श्रम झाला फार ॥३॥
करा आश्रम पुण्यता। आम्हां घड द्यावें तीर्था ॥ ४॥
येथें ‘केलिया आराम। व्यर्थ जाती वांयां श्रम॥५॥
क्रमीं चार दिवस पाहा पोईचा हा वास ॥६॥
द्यावी आम्हां सर्व जोडी । कृपा कराल ती थोडी ।।७।।
करा आनंदें भोजन सेवा सिद्ध उदकपान ॥८॥
म्हणे जावें आश्रमाला । पुढें पंथासी लागला ॥९॥
त्राहें बाहें रे जगदीशा सत्त्व रक्षिसील कैसा ||१०||
ऐसा छळक हा ऋषि नेणों पार कैसा देशी।।११।।
आमची चिंता तुजला हरी जनी म्हणे कृपा करी ।।१२।।
३१०
ऋषि आश्रमा येउनी । येतां देखे ताराराणी ।।१।।
माव करूनि तात्काळ । कैसा निर्मिला नृपाळ ||२||
येऊनि आश्रमासी पाहे डोळां देखियेला राय ॥३॥
शुद्ध सुमन से नीरा घालिताती विंझणवारा॥२४॥
सुगंध चंदन चर्चिती नानापरींच्या उठ्या देती।।५।।
रत्नखचिताची झारी राय घेऊनियां करी ॥६॥
करी आनंदें प्राशन । पुढें दिव्यान्न भोजन ॥७॥
ऐसें करितां अवलोकन । राजा पाहे श्यामवदन ||८||
नव्हे तेंचि कैसें झालें । सूर्या अंधत्व आलें ।।९।।
पुष्पभार शेषावरी। कैसा आजि झाला भारी ||१०||
ध्रुव मेरु गजब जिला । तैसी परी झाली रायाला ।। ११ ।।
जोडोनियां करपया। म्हणे बरी केली सीमा ||१२||
ऐसें होतें जरी मनीं । ती कां राज्य दिलें दानीं । ।१३।।
बुद्धि भविष्यानुसार मी तो आहे येथें स्थिर ||१४||
म्हणोनियां पुढे जाय। अव्हेरिलें धर्मपोय ।। १५ ।।
मार्गी देखियेलें राया। जनी म्हणे लागे पायां ।। १६ ।।
३११
येतां देखोनियां बाळ। ऋषि धांवला तात्काळ ।।१।।
कडे घेऊनि तयाला। ऋषि आश्रमासी आला ।। २ ।।
तुझें मायबापीं प्रेम होय पाहोनी आराम।।३॥
सुखें करुनी भोजन। सुवासिन उदकपान | ४ ||
करुनी क्रमियेलें पंथा। तिहीं सांगितली वार्ता ॥ ५॥
बाळ येतसे मागून । त्याच परामर्श करणें ।।६।।
म्हणोनी सारिलें विंदान। पुढें वाढिलें दिव्यान्न ।।७।।
रडे मोकलुनी धाय । येथें कल्पांतीं न राहे।।८।।
पुढें लागला पंथासी। ऋषि तटस्थ मानसीं ।। ९॥
वदनीं बोट घाली वोजा । ऋषि करितसे चोजा ।।१०।।
ऐसें सत्त्वादिकांपुढें । तप खद्योत बापुडें । ११॥
काय करणें ऐशिवांसी । व्यर्थ मुकलों तपासी ||१२||
मार्गी तियें एक झालीं। दासी जनी आनंदली ।।१३।।
३१२
ऐसें क्रमितां अवधारीं । विश्वेश्वराचे नगरीं ।। १ ।।
देखियेली वाराणसी। थोर आनंद मानसीं ॥२॥
म्हणती घ्यावें शिवदर्शन। तेणें श्रम निवारण ।।३।।
बाप येऊनि चौबारा उभा धरूनि पदरा ||४||
म्हणे कोठें रे दक्षणा बरा होसी चुकवणा॥५॥
जो कां राजा सूर्यवंशीं छत्र चामर जयासी ॥६॥
माथां बांधोनियां तृण पाली विक्रया आपण ॥७॥
राणी म्हणे प्राणेश्वरा आर्थी विक्रा माझाकरा ॥१८॥
रोहिदास कर जोडुनी चरणीं मस्तक ठेवुनी ||१||
आर्थी विक्रा माझिया द्रव्यासी। तुम्हीं द्यावें कौशिकासी ॥१०॥
ऐसें दोघांचें उत्तर नवल करी ऋषीश्वर ।।११।।
काय करा याच्या बोला। म्हणे वजनी सोनें घाला ।।१२।।
अग्रिहोत्री तो ब्राह्मण उभा रायायें येऊन ।।१३।।
देई तारामती तुक। एक भार हा कनक ।।१४।।
रोहिदास म्हणे ताता। माता स्नेह माझ्या चित्ता।।१५।।
राव बोलिला वचन। शीघ्र यावें वा भेटोन ।। १६ ।।
उभी राहोनी वेल्हाळा पोटीं बाळाचा उमाळा ।।१७।।
अश्रु ढाळिती लोचन हा हा शब्द करी रुदन।।१८।।
बोले कौशिक ये माते । स्नेह सोड चाल पंथें ॥१९॥
करूनियां ताडातोडी पाहे कवतुक आवडी ।।२०।।
माता म्हणे बाळकासी ममता असूं दे मजपाशीं ।। २१ ।।
रोहिदास ताराराणी। तेही घेतली ब्राह्मणीं ।। २२ ।।
मोल देऊनियां दुणें राव घेतला डोंबानें ॥ २३॥
घेऊनियां घरा आला येऊन सांगतो भायेंला ||२४||
सेवक आणिला तुम्हांसी सेवा घ्यावी आवडेल तैसी।।२५।।
घागर घेऊनियां हातीं । पाणी आणी शीघ्र गति ।।२६।।
कुंभ घेऊनि चालिला खडा हाणोनि फोडिला ॥२७॥
रिक्तपाणी येतां त्यासी । अवधे धुमिसिती रायासी ।।२८।।
हा तो पहिलाच शकून पुढें येणें काय करण ।। २९।।
म्हणती हा तो नव्हे भला। यासी ठेवा स्मशानाला ||३०||
राव रक्षी स्मशानासी म्हणे नामयाची दासी ।। ३१ ।।
३१३
अनामिक त्यासी पुसे तुमचे भोजनाचे कैसे।।१।।
कर संपुष्ट जोडुनी राय विनवी मधुर वचनीं ॥२॥
जेणें निधे तुमचें काम। राखा माझाही स्वधर्म ।। ३॥
नृपा दिलें कोरें अन्न। सुखें करावें भोजन ||४||
धान्य घेऊनियां करीं। राव आला गंगातीरीं ॥५॥
स्नान संध्या नेम सारी। राजा स्वयंपाक करी ॥६॥
गाय अग्रीचा पैं ग्रास ठाव वाढिला धर्मास ||७||
ग्रास घालावा वदनीं। आला विश्वामित्र मुनी ||८||
बैसावें जों भोजनासी अकस्मात् पावे ऋषी ||९||
एक भाग महिला दुमा राजाचा उचलिला ।।१०।।
तुम होयोनि ऋषेश्वर उठे देउनी डेकर।।११।।
पदर कसुनी कटासी सदा सादर सेवेसी||१२||
निराहार शक्तिहीन दिसे जैसा [क] दीन।।१३।।
ऐसा छळी प्रतिदिनी म्हणे नामयाची जनी ||१४
३१४
येरीकडे ताराराणी द्विजा घरीं वाहे पाणी।।१।।
छिद्र पाडोनि रांजणा पाणी त्यामध्यें थारेना ||२||
नानापरीचें गांजणें देती गाळी हो प्रदानें।।३।।
पाणी वाहणें कीं खेळां होऊं आली सांजवेळा ॥४॥
काळ कौशिक ब्राह्मणें । नित्य अग्निहोत्र करणें ||५||
रोहिदासा आज्ञा करी। समिधा आणाव्या झडकरी ॥६॥
संगें घेऊनियां गड़ी बना चालिला तांतडी ||७||
धरूनियां सर्पवेष रोहिदासा केला देश||८||
येउनी सांगती मातेस । सर्वे खादलें पुत्रास ।।९।।
गेला चंद्र उतरोनी दिसे जैसी म्लान वदनीं ।।१०।।
करुणा आली ब्राह्मणासी । जाय सांभाळी पुत्रासी ।।११।।
रडे मोकलोनी धाय म्हणे आतां मी करूं काय ॥१२॥
काय करूं आतां कैसें । कोठें गेलें हो पाडस ।।१३।।
प्राण राहिला संकटीं करा पाडसाची भेटी ।।१४।।
निविड अंधार काळोख दीर्घ स्वरें मारी हांक ।।१५।।
ठेचा पाय अडखळत पुढे पावासी लागत ।। १६ ।।
बाळ कवळोनी हात। जनी म्हणे शंख करीत ।।१७।।
३१५
वेष धरोनी ब्राह्मण तिसी करी संभाषण ।।१।।
खेद न करी मानसीं काय करणें होणारासी ॥२॥
वेगीं संस्कारी याला दिवसा मागतीं जा कामाला ||३||
घेऊनियां प्रेतासी । वेगीं चेतवी अनीसी ॥४॥
ज्वाळा अवलोकितां नयनीं । राव आला तत्क्षणीं ॥५॥
म्हणे कोण गे तूं येथें । येरी म्हणे तुमचा सुत ॥६॥
कैंचा सुत कैसा काय आमचा हक कोठें आहे ।।७।।
करुणा म्लानी करी त्याची म्हणे गोष्ट हे तों कैंची।।८।।
बरॅपणें जाई आतां। दंड बैसतील माथां ।।९।।
घेई प्रेत ओसंगळी । वेगें प्रवेशे देउळीं ।।१०।।
आवडें प्रेत झोपी जाय। ऋषि धांवे लवलाहे ।।११।।
उदर चिरोनियां नखीं । मांस कवळें घालीं मुखीं ।।१२।।
येऊनियां नगरनारी । जनी म्हणे शंख करी ॥१३॥
३१६
धांवा धांवा नगरवासी। लास भक्षिते लेंकुरासी ।।१।।
अवधे होऊनियां गोळा कोणी न जाती देउळा ||२||
बाळ करोनी पाहती । शेण धुळी धोंडे माती ।।३।।
मारोनी बाहेर घातली केली डोंबाचे हवालीं ।।४।।
हिच्या करा शिरच्छेदाला। तंव तो आज्ञापी रायाला ॥५॥
राय घेऊनियां तिला । आणियेलें ठिकाणाला ।।६।।
म्हणे करीं हो स्मरण तुझें कुळदैवत कोण ।।७।।
खड्ग पुसोनियां धारा घाव घाली जो शिरा ॥८॥
ऋषि धांवला सत्वरी वरच्यावरी कर धरी ।।९।।
म्हणे माग मी प्रसन्न येरी बोले हास्यवदन ॥१०॥
रोहिदासा ऐसा पुत्र । हरिश्चंद्र राजा भ्रतार ।। ११ ।।
याचक विश्वामित्रा ऐसा जन्मोजन्मीं दे जगदीशा ।। १२ ।।
बापा भली केली सीमा तप वोपितों मी तुम्हां ।। १३ ।।
गगनीं विमानें दाटतीं। सुमनभार वरुषती ।।१४।।
वेगीं उतरलें विमान । नामयाची जनी म्हणे ।। १५ ।।
३१७
दूत विनविती कर जोडुनी । म्हणती आरुढावें विमानीं । । १ ।।
ऋषि म्हणे न घडे ऐसें । ह्याची तृप्ति नाहीं आस ।। २ ।।
टपावरोनी काढिला पटीं बैसवीन ह्याला ||३||
थोर वाजत गाजत विप्र मंत्रघोष करीत ।।४।।
विजयी झाला हरिश्चंद्र आडवा पावला परिवार ।।५
लक्षानुलक्ष आरत्या करिती । नगरनारी वोवाळिती ।।६।।
ऋषि अभिषेकिती रायाला थोर मनीं आनंदला ॥७॥
राया प्राप्ती जाला पट। गुडी उभवी वसिष्ठ ||८||
येथुनी हरिश्चंद्र आख्यान । नामयाची जनी म्हणे ॥ ९ ॥