अभंग,संत जनाबाई – विठ्ठलमाहात्म्य

१६

पुंडलिक भक्तबळी विठू आणिला भूतळीं ॥१॥

अनंत अवतार केवळ उभा विटेवरी सकळ॥२॥

वसुदेवा न कळे पार नाम्यासवें जेवी फार ॥३॥

भक्त भावार्था विकला। दासी जनीला आनंद झाला ॥४॥


sant-janabai-abhang-vitthal-mahatmya

१७

भला भला पुंडलिका । तुझ्या भावार्थाचा शिक्का ॥१॥

भलें घालूनियां को परब्रह्म दारापुड़े ॥२॥

घाव घातला निशाणीं ख्याति केली त्रिभुवनीं ॥३॥

जनी म्हणे पुंडलिका । धन्य तूंचि तिन्ही लोकां॥ ४ ॥


१८

पंढरीचे सुख पुंडलिकासी आलें । तेणें हैं बाढिलें भक्तालागीं ॥ १ ॥

भुक्ति मुक्ति वरदान दियलें । तेंहि नाहीं ठेविलें आपणांलागीं ॥ २॥

 उदार चक्रवर्ती बाप पुंडलिक । नामें विश्वलोक उद्धरिलें ॥३॥


१९

अरे विठ्या विट्या मूळ मायेच्या कारट्या ॥१॥

तुझी रांड रंडकी झाली जन्मसावित्री चुडा पाली॥२॥

तुझें गेलें म तुला पाहून काळ रहे॥३॥

उभी राहूनी आंगणी शिव्या देत दासी जनी ॥४॥


२०

जन्म खातां उष्टावळी सदा राखी चंद्रावळी॥१॥

राहीरुक्मिणीचा कांत भक्तिसाठी कण्या खात ॥२॥

 देव भुलले पांडुरंग ऐसा जाणावा श्रीरंग ॥३॥

 जनी म्हणे देवराज करी भक्ताचें हो काज ॥४॥


२१

ऐसा आहे पांडुरंग । भोग भोगूनि निःसंग ॥१॥

अविद्येनें नवल केलें । मिथ्या सत्यत्व दाविलें ॥२॥

जैसी वांझेची संतति जैसी संसार उत्पत्ति ॥३॥

तेथें कैंची या परिसी ब्रह्मीं पूर्ण जनी दासी ॥४॥


२२

स्मरतांचि पावली तरी भक्तांसी लासी॥१॥

ऐसें कांहीं न पडे देवा वांयां कोण करी सेवा ॥२॥

न पुरतां आस मग कोण पुसे देवास ॥३॥

को चक्रपाणी तुज आधी लाही जनी ॥४॥


 २३

बाप रखुमाबाई वर माझें निजाचें बाहेर ॥१॥

तें हें जाणा पंढरपुर। जग मुक्तीचें माहेर ॥२॥

तेथें मुक्ति नाहीं म्हणे जनी न पाहे त्याची वदने ।३॥


२४

अनंत लावण्याची शोभा तो हा विटेवरी उभा ॥१॥

पितांबर माळ गांठीं। भाविकांसी पाली मिठी ॥२॥

त्याचे पाय चुरी हातें । कष्टलीस माझे माते ॥३॥

आवडी बोले त्यासी । चला जाऊं एकांतासी ॥४॥

ऐसा ब्रह्मींचा पुतळा । दासी जनी पाहे डोळां ॥५॥


२५

देव देखिला देखिला । नामें ओळखुनी ठेविला ॥१॥

तो हा विटेवरी देव सर्व सुखाचा केशव ॥२॥

जनी म्हणे पूर्ण काम विठ्ठल देवाचा विश्राम॥३॥


२६

योग शीण झाला । तुजवांचुनी विठ्ठला ॥१॥

योग करितां अष्टांग । तुजविण शुका रोग॥२॥

बैसला कपार्टी। रंभा लागे त्याच्यापाठीं ॥३॥

तई त्वांचि सांभाळिला । जेव्हां तुज शरण आला॥४॥

सांगोनी पुत्रार्ते। त्यांचि छळिलें कश्यपाते ॥५॥

अमराच्या राया। म्हणे जनी सुखालया ॥६॥


२७

आळवितां धांव पाली ऐसी प्रेमाची भुकेली॥१॥

 ते हे बी  स्वानंदाचें लेणेंल्याली पाहून दासी जनी घाली ॥२॥

विटेवरी उभा नीट केली पुंडलिकें धीट ॥३॥


 २८

स्तन पाजायाशी आली होती ते माउशी ॥१॥

तिच्या उरावरी लोळे विठो माझा क्रीडा खेळे ॥२॥

मेल्यें मेल्यें कृष्णनाथा । सोडीं सोडीं रे अनंता ॥३॥

लिंग देह विरविरलें । जनी म्हणे या विठ्ठलें ॥४॥


२९

अहो यशोदेचा हरी गोपिकांसी कृपा करी ॥१॥

वेणु वाजवितो ही सर्व देवांचा साहाकारी||२||

 धांवे धांवे गाईपाठी जनी म्हणे जगजेठी॥३॥


३०

विठो माझा लेकुरवाळा । संगें लेंकुरांचा मेळा ॥१॥

निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी ॥२॥

पुढे चाले ज्ञानेश्वर मार्गे मुक्ताई सुंदर ॥ ३॥

गोरा कुंभार मांडिवरी चोखा जीवा बरोबरी ॥४॥

बंका कडियेवरी नामा करांगुळी धरी ॥५॥

जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा ॥६॥


३१

नोवरीया संगें वन्हाडीया सोहळा मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न ॥१॥

परीसाचेनि संगें लोहो होय सोनें तयाची भूषणे श्रीमंतासी ॥२॥

जनी म्हणे जोड झाली विठोबाची दासी नामयाची म्हणोनियां ॥३॥


३२

तुझ्या निजरूपाकारणें वेडावालीं षड्दर्शनें ॥१॥

परि सोय न कळे त्यांसी । समीप असतां देवासी ॥२॥

चारीश्र में हो कष्टती। वेदशाखे धुंडाळिती ॥३॥

परि कवर्णे रीति तुला न जाणवे जी विठ्ठला ॥४॥

तुझी कृपा होय जरी दासी जनी ध्रुपद करी ॥५॥


३३

पंढरी सांडोनी जाती वाराणसी काय सुख त्यांसी आहे तेथें ॥ १॥

तया पंचक्रोसी म्हणती मरावें। मरोनियां व्हावें जीवन्मुक्त ॥ २ ॥

नको गा विठोबा मज धाडूं काशी सांगेन तुजपाशीं ऐक आतां ॥३॥

मरचीमात्र वेरण स्तंभीं घाली घालोनियां गाळीं पापपुण्य ॥४॥

जावोनियां तेथें प्रहर दोन रात्रीं । सत्य मिथ्या श्रोतीं श्रवण करा ॥५॥

आई आई बाबा म्हणती काय करूं। ऐसें दुःख थोरू आहे तेथें ॥६॥

इक्षुदंड घाणा जैसा भरी माळी। तैसा तो कवळी काळनाथ॥७॥

लिंगदेहादिक करिती कंदन तेथील यातना नको देवा ॥८॥

न जाय तो जीव एकसरी हरी रडती नानापरी नानादु:खें ॥९॥

अमरादिक थोर थोर भांबावले। भुलोनियां गेले मुक्तीसाठीं ॥१०॥

ती ही मुक्ति माझी खेळे पंढरीसी । लागतां पायांसी संतांचिया ॥११॥

ऐसिये पंढरी पहाती शिखरी आणि भीमातीरी मोक्ष आला॥१२॥

सख्या पुंडलिका लागतांचि पाया। मुक्ति म्हणे वांयां गेलें मी कीं ॥१३॥

पर रिपवणी मुक्ति होय दासी मोक्ष तो पाठीसी धांव घाली ॥१४॥

मोक्ष सुखासाठी मुक्ति लोळे। वीं नेपे कोणी कदा काळीं ॥१५॥

मोक्ष मुक्ति जिहीं हाणितल्या पायीं। आमुची ती काय धरिती सोयी ॥ १६ ॥

समर्थाचे घरी मिक्षा नानापरी मागल्या पदरी पालिताती ॥१७॥

अंबोल्या सांडोनी कोण मागे भीक। सामराज्याचें सुख तुझें ॥ १८॥

जनी म्हणे तुज रखुमाईची आण जरी मज क्षण विसंबसी ॥ १९ ||