अभंग,संत जनाबाई -संतस्तुतिपर
sant-janabai-abhang-santastutipar
|| संत जनाबाई -संतस्तुतिपर ||
१६४
संतांचा तो संग नव्हे भलतेसा पालटावी दशा तात्काळिक ॥१॥
चंदनाचे संगें पालटती झाडें। दुर्बलांकडे देवमाथां ||२॥
हैं कां ऐसे व्हावे संगती स्वभावें आणिके न पालटायें देहालागीं ||३||
तैसा निःसंगाचा संग अग्रगणी जनी ध्याय मनीं ज्ञानेश्वरा ||४||
१६५
संत हे कोण तरी देवाचे हे डोळे। पूजेविण आंधळे देवाचिये ।।१।।
कोण्या नेत्रें देव पाहे तुजकडे। यासाठी आवडे संत करी ॥२॥
संत ऐसे करी देवाचे कान सांडियेल्या ध्यान कोण ऐके।।३।।
संत घुसती तरी देवाचे ते पाय आगमा न गमे सोय मागाडीये ||४||
संत पुससी तरी देवाचें तें पोट धरूनियां बोट दाविती हरी।।५।।
संत म्हणसी तरी देवाचा हा गळा । जेणें रस आगळा वेदादिकां ।।६।।
संत जरी पुससी तरी देवाचें वदन । माझें तें वचन संत झाले ||७||
पराविया चारी सांडूनि मीपणीं संता बोले वाणी विठोबाची ||८||
परेचिया चारी आनंदामाझारी संत झाले अंतरी पडजीभ देवा ||9||
क्षस्ते नासिलें अक्षर तें काढिलें । निःशब्दाचें झालें बोले संत।। १०॥
शब्द तो उडाला नाद तो बुडाला भेद तो आटला माया भावीं ।।११।।
विठो बटावरी पारविया झाले केश ते वाढले माय संत ।।१२।।
कुरळ होऊनियां देती ते सुदा म्हणे जनी वोवाळ जीवैभावें॥१३॥
१६६
या वैष्णवाच्या माता तो नेणवें देवां देतां ||१||
तिहीं कर्म हैं पुसिलें अकर्म समूळ नाहीं केलें ॥२॥
कानाचे हे कान झालें धरूनियां ध्यान ॥ ३॥
डोळियाचा डोळा करुनी धाले प्रेम सोहळा ||४||
तोही वश्य नरदेहीं जनी दासी बंदी पायीं ॥५॥
१६७
भक्तांमाजीं अग्रगणी पुंडलिक महामुनी ।।१।।
त्याचे प्रसादें तरलें। साधुसंत उद्धरिले ॥२॥
तोचि प्रसाद आम्हांसी । विटेवरी हृषीकेशी ।। ३ ।।
पुंडलिक बापमाय दासी जनी बंदी पाय ||४||
१६८
अळंकापुरवासिनी समिप इंद्रायणी पूर्वेसी वाहिनी प्रवाह तेथें || १ |
ज्ञानाबाई आई आर्त तुझे पायीं। धांवोनियां देई दुडदुडां ।। २।।
बहु कासाविस होतो माझा जीव कनवाळ्याची कींव येऊं द्यावी।।३।।
नामयाची जनी म्हणावी आपली पायी सांभाळावायें।४॥
१६९
आंधळ्याची काठी अडकली कवणें बेटीं ।।१।।
माझिये हरणी । गुंतलीस कोणे रानीं ॥२॥
मुर्के मी पाडस चुकलें भोवें पाहें वास ॥३॥
तुजवीण काय करूं प्राण किती कंठीं धरूं ॥४॥
आतां जीव जाऊं पाहे धांव घालीं माझें आये ॥५॥
माझी भेटवा जननी संतां विनवी दासी जनी ॥६॥
१७०
पाहतां पंढरिराया । त्याच्या मुक्ति लागे पायां ॥१॥
पुरुषार्थे चारी । त्याचें मोक्ष आर्जव करी ||२||
धन संपत्तीचा दाता होय पाहतां पंढरिनाथा ||३||
संताचे चरणीं लोळे नाचे दासी जनी ॥४॥
१७१
विष्णुमुद्रेचा अंकिला। तोचि वैष्णव एक भला || १॥
अहं जालोनी अंगारा सोहं भस्मी तीर्थ सारा ||२||
विष्णु माया द्वारावती भक्तिमुद्रा त्या मिरवती ||३||
पंचायतन पूजी भावें अहं सोहं भस्मी नांवें ||४||
प्रेमतुळसी कानीं । म्हणे नामयाची जनी ॥५॥
१७२
वैष्णव तो कबीर चोखामेळा महार। तिजा तो चांभार रोहिदास ||१||
सजण कसाई बाया तो कसाब। वैष्णव तो शुद्ध एकनिष्ठ ||२||
कमाल फुलार मुकुंद जोहरी। जिहीं देवद्वारीं वस्ति केली ॥३॥
राजाई गोणाई आणि तो नामदेव । वैष्णवांचा राव म्हणवितसे ॥४॥
वैष्णवांचरणीं करी ओवाळणी तेथें दासी जनी शरीराची ॥५॥
१७३
वैष्णव तो एक इतर तीं सोंगें। उसे देउनी अंगें चितारिती ॥१॥
जिचे योनि जन्मला तिसी दंडूं लागला । तीर्थरूप केला देशधडी ॥२॥
नाइकोनी ब्रह्मज्ञान जो का दुराचारी अखंड द्वेष करी सज्जनांचा॥३॥
विद्येच्या अभिमानें नाइके कीर्तन। पाखांडी हे म्हणे करिती काई ||४||
पंचरस पात्रा कांता है बुडविती । उद्धरलों म्हणती आम्ही संत ॥५॥
कीर्तनाचा द्वेष करी तो चांडाळ तयाचा विटाळ मातंगीसी ॥६॥
वैष्णव तो एक चोखामेळा महार जनी म्हणे निर्धार केला संतीं ||
१७४
पंढरीचा वारकरी त्याचे पाय माझे शिरीं ।।१।।
हो कां उत्तम चांडाळ पायीं ठेवीन कपाळ ॥२॥
वंद्य होय हरिहरा । सिद्ध मुनि ऋषीश्वरा ||३||
मुखीं नाम गर्जे वाणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥
१७५
आले वैष्णवांचे भार दिले हरिनाम नगार।।१।।
अवघी दुमदुमली पंढरी। कडकडाट गरुडपारीं ॥२॥
टाळ मृदंग धुमाळी रंगणी नाचे वनमाळी ||३||
ऐसा आनंद सोहळा दासी जनीं चाहे डोळां ॥४||
१७६
श्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदार साधुसंतां ऐसे केलें जनीं ॥१॥
संतांचे परसी दासी मी अंकिली। विठोबानें दिली प्रेमकळा ||२||
बिदुर सात्विक माझिये कुळीचा अंगिकार त्याचा केला देवें ।।३॥
न विचारितां कुळ गणिका उद्धरिली नामें सरती केली तिहीं लोकीं ||४||
ऋषींची कुठे उच्चारिली जेणें स्वर्गावरी तेणें वस्ती केली ॥५॥
नामयाची जनी भक्तीतें सादर। माझें तें साचार विटेवरी ॥६॥
१७७
संतभार पंढरीत कीर्तनाचा गजर होत॥१॥
तेथे असे देव उभा । जैशी समचरणांची शोभा ॥२॥
रंग भरे कीर्तनांत प्रेमें हरिदास नाचत ॥३॥
सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचें जो जिव्हार ||४||
ऐशा संतांशरण जावें। जनी म्हणे त्याला घ्यावें ॥५॥