अभंग ,संत जनाबाई-संत सेना न्हावी चरित्र
sant-janabai-abhang-sant-sena-nhavi-charitra
|| संत जनाबाई-संत सेना न्हावी चरित्र ||
२७८
सेना न्हावी भक्त मला तेणें देव भुलविला ॥ १ ॥
नित्य जपे नामावळी लावी विठ्ठलाची टाळी।।२।।
रूप पालटोनि गेला। सेना न्हावी विठ्ठल झाला ॥३॥
काखें घेउनी धोकटी गेला राजियाचे भेटी ।।४।।
आपुलेहातेंभारघालीराजियाचीसेवाकेली||५||
विसरतोपडलारामा। कायकरूंमेघश्यामा||६||

राजा अयनियांत पाहे । चतुर्भुज उभा राहे ।।७।।
दूत धाडूनियां नेला। राजियानें बोलाविला ॥८॥
राजाबोलेप्रीतिकर। रात्रीसेवाकेलीफार||९||
राजसदनाप्रती न्यावें । भीतरींच घेउनी जावें।।१०।।
आतां बरा विचार नाहीं। सेना म्हणे करूं काई ।।११।।
सेना न्हावी गौरविला राजियानें मान दिला।।१२।।
कितीकांचा शीण गेला । जनी म्हणे न्हावी झाला ।।१३।।