अभंग ,संत जनाबाई – प्रारब्धगति

३४३


बघायाला गेले क्रियामण शिडी घालूनियां उडी तेथें आले ।।१।।


पुरवी या नवसा म्हणवी गा देवा । टोंचियेले जीवा गळ देहीं ।।२।।


आठ चारी फेरे फिरविती त्यासी पाहती नवसासी पुरलें नाहीं ॥३॥


दुःख सुख तेथें पाहुनी प्रमाण करिती समान क्रीयमाण ||४||


दुरुनी पाहती दावी जनीं दासी म्हणे नामयासी पहावें स्वामी ॥५॥

sant-janabai-abhang-prarabdhagati

३४४


शेष पुसतां बाणातें। कोणे काजा आला तेथें।।१।।


वाण करी अहाकार मुखें पडलीया धूर ||२||


वृक्ष पाडी हो मक्षिका । तैसें येथें झालें देखा ||३||


काय शिखंडीचे बाण करिती भीष्माचें पतन ||४||


तेथें मागितलें पाणी । म्हणे नामयाची जनी ॥५॥