अभंग,संत जनाबाई -नामदेवाचें गोणाईशी भाषण

३४५


माझा हा विठोबा येईल गे केव्हां जेवीन मी तेव्हां गोणाबाई ।। १॥


जाउनी राउळा तयासी तूं पाहे । लवकरी बाहे भोजनासी ॥२॥

sant-janabai-abhang-namdevanche-gonaishi-bha


भरलिया रागें क्रोध त्याचा साहे लवकरी बाहे भोजनासी ॥३॥


ज्ञानेश्वरा घरीं असेल बैसला। जाउनी विठ्ठला पाहें तेथें ॥४॥


जनी म्हणे देवा चला पुरुषोत्तमा। खोळंबला नामा भोजनासी ॥५॥