अभंग ,संत जनाबाई -नामसंकीर्तन माहात्म्य

१ 

गाता विठोबाची कीर्ती महापातकें जळतीं ॥ १ ॥

सर्व सुखाचा आगर उभा असे विटेवर ॥२॥

आठवितां पाय त्याचे मग तुम्हां भय कैंचें॥३॥

कायावाचामनें भाव। जनी म्हणे गावा देव ॥४॥


sant-janabai-abhang-namasankirtana-mahatmya

जन्मा येऊनियां देख करा देहाचें सार्थक॥१॥

वाचें नाम विठ्ठलाचें तेगें सार्थक देहाचें ॥२॥

ऐसा नामाचा महिमा । शेषा वर्णितां झाली सीमा ॥ ३॥

नाम तारक त्रिभुवनीं । म्हणे नामयाची जनी ॥ ४ ॥


३ 

नाम फुकट चोखट नाम घेतां नये वीट ॥१॥

जड शिळा ज्या सागरीं। आत्मारामें नामें तारी ॥२॥

पुत्रभाव स्मरण केलें । तया वैकुंठासी नेलें ॥ ३॥

नाममहिमा जनी जाणे। ध्यातां विठ्ठलचि होणें ॥४॥


एक नाम अवघे सार वरकड अवघें तें असार ॥ १ ॥

म्हणोनियां परतें करा आर्धी विठ्ठल हैं स्मरा ॥२

जनी देवाधिदेव । एक विठ्ठल पंढरीराव ॥३॥


५ 

काय हैं करावें। धनवंतादि अवघे ॥१॥

तुझें नाम नाहीं जेथें। नको माझी आस तेथें ॥२॥

तुजविण बोल न मानीं। करीं ऐसें म्हणे जनी ॥३॥


विठ्ठल नामाची नाहीं गोडी काळ हाणोनि तोंड फोडी ॥१॥

गळां बांधोनि खांबासी विंचू लाविती जिव्हेसी ॥ २ ॥

ऐसा अभिमानी मेला। नर्ककुंडीं थारा त्याला ॥३॥

नामा बोध करी मना। दासी जनी लागे चरणा ॥४॥


तो हा भक्तांचे तोडरीं । वाचें उच्चारितां हरी ॥१

काम होऊनि निष्काम। काम भावभक्ति प्रेम ॥२॥

तो हा पूर्ण काम होय । अखंडित नाम गाय । ॥३॥

काम निष्काम झाला मनीं । वंदी नाचे दासी जनी ॥ ४ ॥


नाम विठोबाचे घ्यावें। मग पाऊल टाकायें॥१॥

नाम तारक हैं थोर नामें तरिले अपार ॥२॥

आजामेळ उद्धरिला । चोखामेळा मुक्तीस नेला ॥३॥

नाम दळणीं कांडणी म्हणे नामयाची जनी ॥४


निराकारीचे नाणें । शुद्ध ब्रह्मींचें ठेवणे ॥१॥

प्रयलें काढिलें बाहेरी। संतसाधु सवदागरीं॥२॥

व्यास वसिष्ठ नारदमुनी। टांकसाळ घातली त्यांनी॥३॥

 उद्धव अक्रूर स्वच्छंदीं । त्यांनी आटविली चांदी ॥|४॥

केशव नामयाचा शिक्का। हारप चाले तिन्ही लोकां॥५॥

 पारख नामयाची जनी वरती विठोबाची निशाणी ॥६॥


१०

माझा शिणभाग गेला । तुज पाहतां विठ्ठला॥१॥

पाप ताप जाती । तुझें नाम ज्याचे चित्तीं॥२॥

अखंडित नामस्मरण । बाधूं न शके तथा विघ्न ॥३॥

जनी म्हणे हरिहर भजतां वैकुंठीं त्या घर॥४॥


११

नाम विठोबाचें थोर । तरला कोळी आणि कुंभार ॥ १ ॥

ऐसी नामाची आवडी । तुटे संसाराची बेडी ॥२॥

नाम गाय वेळोवेळां । दासी जनीसी नित्य चाळा ॥३॥


१२

मारूनियां त्या रावणा राज्य दिधलें विभीषणा ॥१॥

सोडवूनि सीता सती। राम अयोध्येसी येती ॥२॥

ख्याती केली रामायणीं म्हणे नामयाची जनी ॥३॥


१३

येऊं ऐसें जाऊं। जनासंगें हेंचि दाऊं॥ १॥

आपण करूं हरिकीर्तन। जाणोनी भक्तीचें जीवन ॥२॥

नाम संशयछेदन। भवपाशाचे मोचन ॥३॥

जनी म्हणे हो देवासी होईल त्याला कसणी ऐसी ॥४॥


१४

हरिहर ब्रह्मादिक। नामें तरले तिन्ही लोक ॥१॥

ऐसा कथेचा महिमा झाली बोलायाची सीमा ॥ २ ॥

जपें तर्फे लाजविलीं । तीर्थे शरणागत आलीं ॥३॥

नामदेवा कीर्तनीं । ध्वजा आल्या स्वर्गाहुनी ॥४॥

 देवती देती ग्वाही । जनी म्हणे सांगू कायी ॥५॥


१५

व्हायें कथेसी सादर मन करूनियां स्थीर ॥१॥

बाबा काय झोपी जाता। झाले चौन्यांशी खाता ॥२॥

नरदेह कैसा रे मागता भेटी नव्हे त्या सीताकांता॥३॥

आळस निद्रा उठावदी जा स्वरूप पाला मिठी ॥४॥

 जनी म्हणे हरिचें नाम मुखीं म्हणा धरूनि प्रेम ॥५॥