अभंग,संत जनाबाई – मागणीपर
sant-janabai-abhang-maganipar
|| संत जनाबाई अभंग– मागणीपर ||
१५५
ऐसा वर देई हरी गाई नाम निरंतरी।।१॥
पुरवी आस माझी देवा जेणें पडे तुझी सेवा ॥२॥
चि आहे माझे मनीं । कृपा करी चक्रपाणी।।३।।
रूप न्याहाळूनियां डोळां । मुखीं नाम लागो चाळा ॥४॥
उदाराच्या राया। दासी जनी लागे पायां।॥५॥
१५६
साधु आणि संत। जन्म द्यावा जी कलींत ॥१॥
मागणेंतेंहेंचिदेवा । कृपाकरीहोकेशवा||२||
संत दयाळा परम। तया साक्षी नारायण ॥३॥
जनी म्हणे ऐसे साधु तयापाशीं तूं गोविंदु||४||
१५७
विटेवरी ब्रह्म दिसे। साधु संतांचा रहिवास ।।१।।
देव भावाचा अंकित जाणे दासाचें तें चित्त||२||
भक्ति जनी मागे देवा । तिचा मनोरथ पुरवा ॥३॥
१५८
देवा देई गर्भवास। तरीच पुरेल माझी आस ।।१।।
परि हे देखा रे पंढरी सेवा नामयाचे द्वारीं ॥२॥
कीं पक्षि कां शुकर। श्वान श्वापद मार्जार ।।३।।
ऐशी आशा हे मानसी म्हणे नामयाची दासी ॥४॥
१५९
ऐसा पुत्र देई संतां। तरी त्या आवडी पंढरिनाथा ॥१॥
गीतानित्यनेमें। वाचीज्ञानेश्वरीप्रेमें||२||
संतांच्या चरणा । करी मस्तक ठेंगणा ॥३॥
कन्या व्हावी भागिरथी । तुझें प्रेम जिचे चित्तीं ॥४॥
ऐसे करी संतजना दासी जनीच्या विधाना॥५॥
१६०
माझें दुःख नाशी देवा मज सुखदेवा।।१।।
आम्हां सुख ऐसे देई तुझी कृपा विठाबाई ||२
शाचरणींअनन्यशरण । त्यासिनाहींजन्ममरण||३||
जनी म्हणे हेंचि मार्गे धण्या सर्व तुज सांगें ||४||
१६१
रुक्माई आईचें आहे ऐसें भाग्य असावें आरोग्य चिरकाल ।।१।।
सख्या पुंडलिका आवडतें स्थळ | असावेंचिरकाळस्वस्तिक्षेम||२||
अहोसंतजनघ्याआवडतेंधनअसावेंकल्याणचिरकाळ||३||
जन्मोजन्मीं हेंचि मार्गे गोविंदासी म्हणे जनी दासी नामयाची ॥४॥
१६२
परधन कामिनी समूळ नाणीं मना नाहीं हे वासना माया केली ॥१॥
तृष्णाहेअधमनव्हावीमजला । प्रेमाचाजिव्हाळादेईतुझ्या||२||
निरपेक्ष वासना दे गा मज सेवा । आणि तुझी सेवा आवडीची ॥३॥
शांतीची भूषणें मिरविती अंगीं । वैष्णव आणि योगी म्हणावे ते।।४।।
असो तो अकुळी असो भलते याती । माथां वंदी प्रीती जनी त्यासी ॥५॥
१६३
द्वारकेच्या राया। बुद्धि दे गा नाम गाया ।।१।।
मतिमंद तुझी दासी ठाव देई चरणांपासीं ॥२॥
तुझे पदरीं पडलें खरी। आतां सांभाळ करी हरी ॥३॥
न कळे हरीची करणी म्हणे नामयाची जनी ॥४॥