अभंग, संत जनाबाई – करुणापर

३४

पाय जोडूनि विटेवरी कर ठेउनी कटावरी ॥१॥

रूप सांवळें सुंदर कानी कुंडलें मकराकार ॥२॥

गळां माळ वैजयंती पुढे गोपाळ नाचती ॥३॥

गरुड सन्मुख उभा म्हणे जनी धन्य शोभा ॥४॥


sant-janabai-abhang-karunapar

  ३५

येगे माझे विठाबाई कृपादृष्टीने तूं पाही॥१॥

तुजविण न सुचे कांहीं। आतां मी वो करूं कांहीं ॥२॥

माझा भाव तुजवरी आता रक्षी नानापरी ॥३॥

येईसखये धांडनी । म्हणे नामयाची जनी ॥४॥


३६

हात निढळावर ठेवूनी वाट पाहे चक्रपाणी ॥१॥

धाव धाव पांडुरंगें। सखे जीव लगे अन्तरंगे ॥ २ ॥

वाट पहाते जगदीशा हांसे करू नको जनासी ॥३॥

तुजवाचुनि दाही दिशा म्हणे नामवासी दासी ॥४॥


३७

सख्या घेतलें पदरीं। आतां न टांकावें दुरी ॥ १ ॥

थोरांचीं उचितें । हेंचि काय सांगों तूंतें ॥२॥

ब्रह्मयाच्या ताता। सज्जना लक्षुमीच्या कांता ।।३॥

आपुली म्हणवूनि आण गावी दासी जनी ॥४॥


 ३८

गंगा गेली सिंधूपाशी त्याणें अव्हेरिलें तिसी ॥१॥

तरी ते सांगावें कवणाला ऐसें बोलें बा विठ्ठला ॥२

जळ कोपे जळचरा माता अव्हेरी लेकुरा ॥३॥

जनी म्हणे शरण आलें। अव्हेरितां ब्रीद गेलें ॥४॥


३९

माझी आंधळ्याची काठी अडकली कवणे बेटीं ॥१

आतां सांगू मी कवणासी । धांवें पावें हषीकेशी ॥२॥

तुजवांचूनी विठ्ठला । कोणी नाहीं रे मजला ॥३॥

माथा ठेवीं तुझे चरणीं म्हणे नामयाची जनी ॥४॥


४०

कां गा न येसी विठ्ठला ऐसा कोण दोष मला ॥१॥

मायबाप तूंचि धनी मला सांभाळी निर्वाणीं।।२।।

त्वां वा उद्धरिलें थोर । तेथे किती मी पामर ॥ ३॥

दीनानाथा दीनबंधु । जनी म्हणे कृपासिंधू ॥४॥


४१

अगा रुक्मिणीनायका सुरा असुरा प्रिय लोकां ॥१॥

 ते तूं धांवें माझे आई सखे साजणी विठाबाई ॥२॥

अगा शिवाचिया जपा | मदन ताता निष्यापा ॥३॥

आपुली म्हणवुनी अपंगावी दासी जनी ॥४॥


४२

नाहीं केली तुझी सेवा दुःख वाटतसे माझे जिवा ॥१॥

नट पापीण मी हीन नाहीं केलें तुझे ध्यान ॥ २॥

जें जें दुःख झालें मला तें त्वां सोसिलें विठ्ठला ॥ ३ ॥

रात्रंदिवस मजपाशीं दळूं कां लागलासी ।।४।।

क्षमा करावी देवराया दासी जनी लागे पार्या ॥५॥


४३

येरे येरे माझ्या रामा मनमोहन मेघश्यामा ||१||

संतमिसें भेटी । देई देई कृपा गोष्टी ।।२।।

आमची चुकवी जन्मव्याधी । आम्हां देई हो समाधी ॥३॥

जनी म्हणे चक्रपाणी । करीं ऐसी हो करणी ॥४।।


४४

अहो नारायणा । मजवरी कृपा कां कराना।। १॥

मी तो अज्ञानाची रासी म्हणोन आलें पायांपाशीं ॥२॥

जनी म्हणे आतां मज सोडवीं कृपावंता ॥३॥


४५

आधीं घेतलें पदरीं । आतां न धरावें दुरी ॥१॥

तुम्हां थोराचें उचितें । हेंचि काय सांगूं तूंतें॥२॥

अहो ब्रह्मियाच्या ताता । सखया लक्षुमीच्या कांता ॥३॥

दयेच्या सागरा। जनी म्हणे अमरेश्वरा॥४॥


४६

आम्हीं जावें कवण्या ठाया। न बोलसी पंढरीराया ॥१॥

सरिता गेली सिंधूपाशीं जरी तो ठाव न दे तिसी ॥२॥

जळ कोपलें जळचरासी माता न घे बाळकासी ॥३॥

म्हणे जनी आलें शरण जरी त्यां धरिलेंसें मौन्य ॥४॥


४७

ऐक बापा हृषीकेशी । मज ठेवीं पायांपाशीं ॥१॥

तुझें रूप पाहीन डोळां । मुखीं नाम वेळोवेळां ॥२॥

हातीं धरिल्याची लाज । माझें सर्व करीं काज ॥३॥

तुजविण देवराया | कोणी नाहीं रे सखया॥४॥

कमळापति कमळा पाणी दासी जनी लागे चरणीं ॥५॥


४८

पोट भरूनी व्यालासी । मज सांडुनी कोठें जासी ॥१॥

धिरा घिरा पांडुरंगा । मज कां टाकिलें निःसंगा ॥२॥

ज्याचा जार त्यासी भार। मजला नाहीं आणिक थार ॥३॥

विठाबाई मायबहिणी । तुझे कृपें तरली जनी ॥४॥


४९

अविद्येच्या वो रात्रीं आडकलों अंधारी।।१॥

तेथुनी काढायें गोविंदा यशोदेच्या परमानंदा ॥२॥

तुझे सन्निधेचे पाशीं ठाव नाहीं अविद्येसी ॥३॥

तुझे संगतीं पावन उद्धरिलें ब्रहों पूर्ण ॥४॥

अजामेळ शुद्ध केला म्हणे दासी जनी भला ॥५॥


५०

धन्य कलत्र माय। सर्व जोडी तुझे पाय ॥१॥

सखा तुजवीण पाहीं दुजा कोणी मज नाहीं ॥ २॥

माझी न करावी सांडणी म्हणे तुझी दासी जनी ॥३॥


५१

रुक्मिणीच्या कुंका। सुरां अमरां प्रिय लोकां ॥१॥

तूं धांव माझे आई। सखे साजणी विठाबाई ॥२॥

शिवाचिया जपा | मदनताता ये निष्पापा॥|३॥

दयेच्या सागरा म्हणे जनी अमरेश्वरा ||४|


५२

मी वत्स माझी गायी। नये आतां करूं काई ॥१॥

तुम्ही तरी सांगा कांहीं शेखी विनवा विठाबाई॥२॥

येई माझिये हरणी चुकलें पास दासी जनी ॥३॥


५३

सख्या पंढरीच्या राया। घडे दंडवत पायां ॥१॥

ऐसें करीं अखंडित । शुद्ध प्रेम शुद्ध चित्त ॥२॥

वेध माझ्या चिता हाचि लागो पंढरीनाथा ॥३॥

जायें भवानी जन्मोजन्मी म्हणे जनी ॥४॥


५४

कां गा उशीर लाविला माझा विसर पडिला ॥१॥

तुजवरी संसार बोळविले परदा॥२॥

तो तूं आपुल्या दासासी म्हणे जनी विसंबसी ॥३॥


 ५५

किती सांगूं तूंतें। बुद्धि शिकवणें हैं मातें ॥१ ॥

सोमवंशाच्या भूषणा । प्रतिपाळी हर्षे दीनां ॥२॥

शिकवावें तूंतें । हाचि अपराध आमुतें ॥३॥

स्वामीलागीं धीट ऐसी म्हणती शिकवी जनी दासी ॥४॥


५६

शिणल्या बाह्या आतां येऊनियां लावी हाता ॥१॥

तूं माझें वो माहेर काय पहातोसी अंतर ॥२॥

वोवाळुनी पायां जीवेंभावें पंढरिराया ॥३॥

धर्म ताता धर्म लेंकी। म्हणे जनी हैं विलोकीं ॥४॥


५७

योग न्यावा सिद्धि। सकळ गुणाचिया निधी ॥१॥

अरूपाच्या रूपा सांब राजाचिया बापा ॥२॥

 ब्रह्मयाच्या ताता म्हणे जनी पंढरिनाथा ॥३॥


५८

माय मेली बाप मेला आतां सांभाळी विठ्ठला ॥ १॥

मी तुझें गा लेंकरूं नको मजशी अव्हेरूं ॥२॥

मतिमंद मी तुझी दासी ठाव द्यावा पायांपाशीं ॥३॥

तुजविण सखे कोण माझें करील संरक्षण ॥४॥

अंत किती पाहासी देवा। थोर श्रम झाला जीवा ॥५॥

गळां माळ वैजयंती पुढे गोपाळ नाचती ॥३॥


५९

अहो सखीये साजणी ज्ञानाबाई हो हरणी॥। १॥

मज पाडसाची माय भक्ति वत्साची ते गाय ॥२॥

लाविला तुजविण शिण झाला ॥३॥

अहो बेसले दळणीं धांव पाली म्हणे जनी ॥४॥


६०

काय करूं या कर्मासी धांव पाव हृषीकेशी॥१॥

नाश होतो आयुष्याचा तुझें नांव नये वाचा ॥२॥

 काय जिणें या देहाचें अखंड अवघ्या रात्रीचें ॥३॥

व्यर्थ कष्टविली माता तुझे नाम नये गातां ॥४॥

जन्ममरणाचें दुःख म्हणे जनी दाखवी मुख ॥५॥


६१

अहो ब्रह्मांडपाळका ऐकें रुक्मिणीच्या कुंका ॥१॥

देवा घेतले पदीं तेंतूं टाकूंन कोदुरी॥ २॥

होते लोकांमध्यें निंद्य त्वां जगांत केले वंद्य ॥३॥

विनवीतसे दासी जनी परिसावी माझी विनवणी ॥४॥


६२

येई जीवाचिया जीवा रामा देवाचिया देवा ॥१॥

सर्व देव बंदीं पडिले रामा तुम्हीं सोडविले ॥२॥

मारूनियां लंकापती सोडविली सीता सती ॥३॥

देवा तुमची ऐसी ख्याती रुद्रादिक से वर्णिती ॥४॥


६३

अहोदेवाहरिहरउतरा आम्हांभवपार॥१॥

देवा आम्ही तुझे दास। करूं वैकुंठी वो वास ॥२॥

जनी म्हणे कल्पवृक्ष देवदुशासी ॥ ३॥


६४

शरण आलों नारायणा। आतां हो पावना ॥१॥

शरण आला मारुतिराया त्याची दिव्य केली काया ॥२॥

शरण प्रल्हाद तो आला। हिरण्यकश्यपू मारिला ॥ ३॥

जनी म्हणे देवा शरण व्हावें भल्यानें जाणोन ॥४॥


६५

ऐका बापा माझ्या पंढरीच्या राया कीर्तना आल्यें या आर्तभूतां ॥१ ॥

माझ्या दुणेदारा पुरवीं त्याची आसनकरींनिरासआर्तभूतां॥२॥

त्रैलोक्याच्या राया सख्या उमरावा अभय तो द्यावा कर तय ॥३॥

जैसा चंद्रश्रवा सूर्य उच्चैश्रवा। अढळपद ध्रुवा दिधलेंसें ॥४॥

 उपमन्यु बाळका क्षीराचा सागरू । ऐसा तूं दातारू काय वानूं॥५॥

म्हणे दासीनी आलें या कीर्तनीं तथा कंठाळुनी पिटूं नका ॥६॥


६६

गजेंद्रासी उद्धरिलें । आम्हीं तुझें काय केलें ॥ १॥

तारिली गणिका । तिहीं लोकीं तुझा शिका॥ २॥

वाल्हाकोळीअजामेळ । पापीकेलापुण्यशीळ॥३॥

गुणदोष मना नाणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥


६७

राजाई गोणाई अखंडित तुझे पायीं ॥१॥

मज ठेवियलें द्वारी नीच म्हणोनि बाहेरी॥२॥

देवा केव्हां क्षेम देसी। आपुली म्हणोनि जनी दासी ॥


६८

काय करूं पंढरीनाथा काळ साह्य नाहीं आतां ॥१॥

मज टाकिलें परदेशीं नारा विटा तुजपाशी ॥२॥

श्रमबहुझालाजीवा । आतांसांभाळीकेशवा॥३॥

कोण सखा तुजविण । माझें करी समाधान ॥४॥

हीन दीन तुझे पोटीं जनी म्हणे द्यावी भेटी ॥५॥