अभंग ,संत जनाबाई-काकड आरती

३४८


उठा पांडुरंगा प्रभातसमयो पातला वैष्णवांचा मेळा गरुडपारी पातला ||१||


वाळवंटापासूनि महाद्वारापर्यंत सुरवरांची दादी उभे जोडूनि हात ।। २॥


शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी । कवाडाआडूनि पाहताती जगजेठी ||३||

sant-janabai-abhang-kakad-aarti


सुरवरांची विमानें गगनीं दाटलीं सकळ। रखुमाबाई माते वेगीं उठवा घननीळ ||४||


रंभादिक नाचती उभ्या जोडुनि हात। त्रिशूळ डमरू घेउनि आला गिरजेचा कांत ॥ ॥५॥


पंचप्राण आरत्या घेऊनियां देवस्त्रिया येती भावें ओवाळिती राही रखुमाईचा पती ॥६॥


अनंत अवतार घेसी भक्ताकारणें कनवाळु कृपालु दीनालागीं उद्धरणें ।।७।।


चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनीं पाठीमागें डोळे झांकुनी उभी ते जनी ||८||