अभंग,संत जनाबाई – दशावतारवर्णन

३४२


ऐसा हा देवानें थोर पवाडा केला। पूर्व अवतारी झाला हयग्रीव ॥ १॥


मग अंबऋषीसाठी पडियेला संकटीं । मच्छ झाला पोटीं समुद्राच्या ।। २ ।।


होउनी कच्छप पर्वत धरिला । वराहे मारिला दैत्य भार ।।३॥

sant-janabai-abhang-dasavataravarnan


तयाचा सहोदर मृत्यु नाहीं ऐसा वर तेव्हां अवतार नारसिंह झाला ||४||


अर्धनारी नटेश्वर दुसरा तो वामन । भार्गव ते निधान दाशरथी ||५||


होऊनियां कृष्ण कंस वधियेला । आतां बुद्ध झाला सखा माझा ॥६॥


लीला अवतारीं हरि करी खेळ नाना म्हणे जनी जाणा तें मी होत्यें ।।७।।