अभंग ,संत जनाबाई – भक्तिस्वरूप
sant-janabai-abhang-bhaktisvarup
|| संत जनाबाई अभंग – भक्तिस्वरूप ||
३४७
भक्ति ते कठीण इंगळाची खाई। रिपर्णे त्या डोहीं कठीण असे ।।१।।
भक्ति ते कठीण विषग्रास घेणें उदास में होणें जीवें भावें ॥२॥
भक्ति ते कठीण भक्ति ते कठीण खड्गाची धार बाण न सोसी तया ।।३।।
भक्ति ते कठीण विचारूनि पाहे जनी भक्तियोगें संतसमागम सर्व सिद्धी ॥४॥