अभंग,संत जनाबाई -आत्मस्वरूपस्थितिपर

१७८


सांवळी ते मूर्ति हृदयीं बिंबली । देहो बुद्धि पालटली माझी साची ॥१॥
धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव। हृदयीं पंढरिराव राहतसे ।। २।।


आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही चिंता विठ्ठलचरणीं जोनी टेली।।३।।
नामयाचे जनरी विश्रांति झाली हृदयीं राहिली विठ्ठलमूर्ती ॥२४॥


sant-janabai-abhang-aatmasvarupa-sthitipar

१७९


वामसव्य दोहींकडे देखूं कृष्णायें रूपदें।।१।।
आतां खाले पाहूं जरी चहुंकडे दिसे हरी ।।२।
चराचरी जे जे दिसे में से अविद्याची नासे।।३।।


माझे नाठवें मीपण तेथें कैंचें दुजेपण ।।4।
सर्वांठायीं पूर्ण कळा । दासी जनी पाहे डोळां ॥ ५ ॥


१८०


धरिला पंढरीचा चोर गळां बांधोनियां दोर ॥१॥
हृदय बंदिखाना केला आंत विठ्ठल कोंडिला ||२॥
शब्द केली जवाजुडी विठ्ठल पायीं घातली बेडी ||३||


सोहं शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुलती आला ||४||
जनी म्हणे बा विठ्ठला । जीवें न सोडीं मी तुला ॥५॥


१८१


दळू कांडूं खें। सर्व पाप ताप जाळूं।।१।
सर्व जिवामध्यें पाहूं एक आम्ही होउनी राहूं ॥२॥
जनी म्हणे ब्रह्म होऊं। ऐसें सर्वाघ पाहूं ॥३॥


१८२


चरण विठोबाचे देखिले । साही रिपु हारपले।।१।।
नाहीं नाहीं म्हणती आम्ही सांगसी त्या लागूं काम ||२||


नाहीं तरी जाऊं देशीं जनी नामयाची दासी ॥३॥


१८३


भ्रांति माझें मन प्रपंची गुंतलें श्रवण मनन होऊनी ठेलें ।।१।।
बायें बोधिलें बायें बोधिली। बोधुनी कैसी तद्रूप झाली ||२||


निजध्यासें कैसा अवघाचि सांपडला । कीं विश्वरूपीं देखिला बाईयांनो ।।३।।
नामयाची जनी स्वयंबोध झाली अवघाचि पुसिला ठाव देखा ॥ ४॥


१८४


संतमहानुभाव येती दिगंबर नम्रतेचे घर विरळा जायें ||१||
निवाले मीपण ते जे ठायीं नाहीं सोहं शब्द सोई तेथें कैंची ||२||


पाहतां हा कोण दावितां हा कोण पाहातां दावितां हे खूण विरळा जाणें ॥३॥
नामयाची जनी निज वस्तु झाली। अवध्यासी बुडाली परब्रह्मीं ॥४॥


१८५


त्या वैष्णवांच्या माता तो नेणें देव ताता ||१||
तिहीं कर्मे हैं पुसिलें अकर्म समूळ नाहींसें केलें ॥ २॥
कानाचा हो कान झालें धरूनियां ध्यान ।।३।।


डोळियाचा हो डोळा। करुनि झालें प्रेमसोहळा ||४||
सोहि बसे नरदेहीं जनी दासी बंदी पायीं ॥५॥


१८६


देहभाव प्राण जाय। तेव्हां हें धैर्य सुख होय ||१||
तया निद्रे जे निजले गाव जागृती नाहीं आले || २ ||
ऐसी विश्रांति लाधली । आनंद कळा संचरली ||३||


तेथें सर्वांग सुखीं झालें लिंग देह विसरलें ||४||
त्या एकी एक होता दासी जनी नाहीं आतां ॥५॥


१८७


जोड झाली रे शिवासी प्रांत फिटली जिवाची ।।१।।
आनंदची आनंदला आनंद बोधसि बोधला ॥२॥
आनंदाची लहरी उठी। ब्रह्मानंदे गिळिला पोटीं ||३||


एकपण जेथें पाहीं । तेथें विज्ञप्ति उरली नाहीं ||४||
ऐसी सद्गुरूची करणी दासी जनी विठ्ठल चरणीं ।।५।।


१८८


बाई मी लिहिणें शिकलें सद्गुरुरायाचाही।। ब्रह्म झाला जो चिनाकार देख पुढे ओंकाराची रेख। तूर्या म्हणावें तिसी ।। १ ।।
माया महत्तत्त्वाचें सुभर तीन पांचाचा प्रकार। पुढें पंचविसांचा भार। गणति केली छत्तीसी ।।२।।
बारा सोळा एकविस हजार आणिक सहाशांचा उबार माप चाले सोहंकार ओळखिले बावन्न मात्रेसी ॥३॥
चार खोल्या चार घरीं चौथे पुरुष चार नारी ओळखुनी सर्वाशी अंतरी राहिले पांचव्यापासीं ॥४॥


पांच शहाणे पांच मूर्ख पांच चालक असती देख पांच दरवडेखोर आणिक । ओळखिलें दोघांसी ।।५।।
एक बीजाचा अंकुर होय वृक्षासी विस्तार शाखा – पत्रें फळ फुलभार। बीजापोटीं सामावें ।।६।।


कांतीण तंतूशी काढून वरी क्रीडा करिती जाण शेवटीं तंतूशी गिळून एकटी राहे आपसी ।।७।।
वेदशास्त्र आणि पुराणा । याचा अर्थ आणितां मना । कनकीं नगाच्या भूषणा अनुभव वाटे जीवासी ||८||
नामदेवाच्या प्रतापांत शिरी विठोबाचा हात जनी म्हणे केली मात पुसा ज्ञानेश्वरासी ॥९॥


१८९


नम्रतेविण योग्यता मिरविती ते केवीं पावती ब्रह्मसुख ।। १ ।।
लटिकें नेत्र लावूनि ध्यान पैं करिती । ते केवी पावती केशवातें ||२||
एक संत म्हणविती न हिंडती। अंतरीची स्थिति खबर।।३॥


झालेपणाचे गुण दिसताती सगुण । वस्तु ते आपण होऊनि ठेली ।।४।।
सागरी गंगा मिळोनि गेली जैसी । परतोनियां तियेसी नाम नाहीं ॥५॥
नामयाची जनी निर्गुणी बोधिली ठेवा जो लाधली पांडुरंग ॥६॥


१९०


शब्दार्थे ब्रह्म लौकिकीं हो दिये। जैसे ते फांसे मर्यादांचें।।१।।
ज्ञानी तो कोण विज्ञानी तो कोण दोहींचा आपण साक्षभूत ||२||


स्वयें सुखें धाला आपणातें विसरला तो योगि राहिला नाहीं येथें ॥३॥
नामयाची जनी सागरीं मिळाली परतोनि मुळीं केवीं जाय ||४||


१९१


अखंडित ध्यानीं। पांडुरंग जपे वाणी ।।१।।
पांडुरंग नाम जप हेंचि माझें महा तप ||२||
ऐसें आलें प्रत्ययासी सहज तेणें तत्त्वमसी।।३।।


पावलिया हो स्वपद। सहज बिराला तो शब्द ||४||
संदेह अवघाचि फिरला । जनी म्हणे उदयो झाला ॥५॥


१९२


देव खातें देव पितें । देवावरी मी निजतें ।।१।।
देव देतें देव घेतें । देवासर्वे व्यवहारितें ||२||
देव येथें देव तेथें। देवाविणें नाहीं रितें ॥३॥
जनी म्हणे विठाबाई भरूनि उरलें अंतरबाहीं ॥४॥


१९३


श्रीमूर्ती असे बिंबली तरी हे देहस्थिती पालटली ॥१॥
धन्य माझा इह जन्म हृदयीं विठोबाचें नाम ||२॥


तृष्णा आणि आशा पळोन गेल्या दाही दिशा ॥३॥
नामा म्हणे जनी पाहे । द्वारीं विठ्ठल उभा आहे ।।४।।


१९४


जनी दृष्टी पाहे जिकडे तिकडे हरी आहे।।१।।
मग म्हणे वो देवासी दासी || २ ||
नामयाचा प्रसाद झाला जनीला आनंद ॥३॥