आदिनाथे उपदेश पार्वतीसी ।

केला मच्चें ऐकिला मछगर्मी ॥१॥

शिवहृदयीचा मंत्र पे आगाध ।

जालासे प्रसिद्ध भक्तियोगे ||२||

त्याने त्या गोरक्षा केले कृपादान ।

तेथोनि प्रमट जाण गहेनीप्रती ॥३॥

गहेनीने दया केली निवृत्तिनाथा ।

बाळपण असता योगरूप ॥४॥

तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद ।

जाले ते प्रसिद्ध सिद्धासनी ||५||

सच्चिदानंदबाबा भक्तीचा आगर । त्

यासी अभयवर ज्ञाने केला ||६||

पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर ।

तेणे राघवी विचार ठेविलासे ||७||

केशव चैतन्य बाबाजी चैतन्य ।

जालेसे प्रसन्न तुकोबासी ||८||

येकनिष्ठ भाव तुकोबाचे चरणी ।

म्हणोनी बहेणि लाधलीसे ।।९।।



देवगाव माझे माहेर साजनी

वेरुळ तेथोनी पूर्व भागी ।।१।।

देवांचा समूह सर्व जये ठाई

मिळालासे पाही देवगावी ||२||

हिमालयाहुनी चालिला अगस्ती

चातुर्मास्य वस्ती केली जेथे ||३||

तेथुनी पश्चिमे शिवनद वाहात ।

तीर्थ हे अद्भुत तीर्थामाजी ॥४॥

लक्ष तीर्थ जेथे येऊनी सर्वदा ।

लाक्षायणी सदा वास तेथे ।।५।।

ते स्थळ पवित्र देखोनी अगस्ती

अनुष्ठाना येती दिनोदई ।।६।।

वरद दिधला ऋषी अगस्तीने

लक्ष तीर्थे जाण लाक्षाग्रामा ।।७।।

स्नान दान करी जप अनुष्ठान

सिद्धी तेथे जाण होय नरा ॥८॥

अगस्ती राहोनी देवगावी जाण ।

शिवनदीस्नान करी सदा ||१||

बहेणि म्हणे ऐसे स्थळ देवग्राम

तेथे माझा जन्म जाला असे ।।१०।।



आऊजी कुलकर्णी लेखक तये स्थळी

तयाचिये कुळी जन्म जाला ।।१।।

माता ते जानकी पिता आऊदेव

देवगाव नाव स्थळ त्यांचे ॥२॥

तयांचिये कुळी नाही जी संतान ।

करी जी संताना काही बाही ।।३।

लक्षतीर्थी नित्य करुनिया स्नान

शिव-अनुष्ठान आरंभिले ||४||

कितेक दिवसात जाले स्वप्न तया

माझिया पितया आउजीसी ।।५।।

होईल संतान कन्या दोन पुत्र

ब्राह्मणे पवित्रे सांगितले ॥६॥

बहेणि म्हणे वरुषा येका मी

उत्पन्न नवमास पूर्ण कन्या जाले ॥७॥



करिती उत्छाह वारसा ब्राह्मण

करुनी भोजन घरा गेले ||१||

पिता आऊदेव गेला अरण्यात

तव अकस्मात लाभ जाला ॥२॥

मोहर बांधली पितांबरी-गाठी

सापडली वाटी वेरुळाच्या ||३||

घरा येउनीया आनंदे बोलती ।

कन्या आम्हाप्रती लाभाईत ||४||

वीरेश्वर द्विज ज्योतिषी नेटका

तयाने पत्रिका संपादिली ॥५॥

होईल कल्याण इचेनि तुमचे ।

ऐसे पत्रिकेचे फळ वाची।।६।।

देवलसी काही भाग्याची होईल ।

आयुष्याचे बळ फार आहे ।।७।।

बहेणि म्हणे ऐसे द्विजे सांगितले ।

तयासी दिधले वस्त्र गाई ॥८॥



कन्यादान घडो हा अर्थ पाहोन ।

करावया लग्न द्विज आले ।।१।।

तव अकस्मात प्राक्तनासारिखा ।

सिऊराचा सखा येक आला ॥२॥

पूर्विल सोयरा लग्नाचा इच्छक विवेक

पाठक रत्न नामी ॥३॥

लाउनी मागणे केले वाक्प्रदान ।

नेमुनिया लग्न संपादिले ।।४।।

तव बंधू जाला माझ्या पाठीवरी

अनुष्ठाना करी पूर्वीचिया ॥५॥

म्हणती हे सभाग्य बंधू पाठीवरी

जाला हे निर्धारी गुण इचा ||६||

बहेणि म्हणे ऐसी जाली वर्षे तीन ।

त्यापुढे जे होणे तेही बोले ।।७।।




मौनस गोत्र माझ्या पित्याचे वरिष्ठ ।

भ्रतारही श्रेष्ठ गौतम तो ।।१।।

शिवपुर नाम तेथील ज्योतिषी ।

मायबापे त्यासी समर्पिले ॥२॥

वितीय- समंधी वरुषा तिसाचा ।

नोवरा भाग्याचा ज्ञानवंत ||३||

बहेणि म्हणे त्यासी कन्यादान केले

आंदन दिधले सर्व काही ॥४॥



लग्न संपादोनी जाली वरुष चारी ।

गोत्रजांचा वैरी पिता जाला ॥१॥

वृत्तीच्या समंधे कलह मांडला ।

माझा बोलाविला भ्रतार हा ॥२॥

गोत्रजांची फेडा बाकीसाकी

रीण मागती लिहून सेतमळा ॥३॥

आता येथोनिया जावे पदरदेसी

तरीच आम्हासी सुख होते ॥४॥

तू सखा सोयरा जावई मित्र तू

आमुचा हा अंतु पाहू नको ॥५॥

घातलेसे बंदी सोडवील कोण

तू सखा होऊन सोडवाव।।६।।

मग त्या प्रतारे काढिले बाहेरी

निशीचिया भरी मध्यरात्री ॥७॥

पिता माता बंधू मजही समवेत

गेले रातोरात गंगातीरा॥८॥

प्रवरासंगमी केले गंगास्नान

घेतले दर्शन सिद्धनाथे ||१||

बहेणि म्हणे पुढे चालिले तेथोनी

पाय वोसंतुनी महादेवा ||१०|



गंगा देखोनिया सिद्धेश्वर देव

तेथोनिया जीय नियो नेणे ॥१॥

आवडीचा हेत पूर्वील संस्कार

श्रवणी आदर कीर्तनाचे ||२||

पुराणश्रवण पूजा देवस्थान

ब्राह्मणपूजन प्रीति यांची ॥३॥

संन्यासी सज्जन संत महानुभाव

यांचे पायी जीव लागलासे ॥४॥

नियता तेथुन थोर वाटे दुःख

अदृष्ट करंटे काय कीजे ॥५॥

बहेणि म्हणे पुढे महादेवा जाये।

प्रतार गौरये नेत आम्हा ।।६।।



मागोनी भिक्षेसी क्रमितसे वाट

सोमुनिया कष्ट नानापरी ।।१।।

मायबाप बंधू प्रतारेसी जाण ।

महादेववन पाहावया ॥२॥

नरसिंहदर्शन घेउनी संपूर्ण

पांडुरंगस्थान देखियेले ॥३॥

भीमा चंद्रभागा पुंडलीक भक्त

वेणुनादी मुक्त प्राणिमात्रे ||४||

पद्मालयी स्नान देवाचे

दर्शन नामसंकीर्तन आइकिले||५||

राही रखुमाई सत्यभामा

सर्व देखियेले पूर्वद्वारयुक्त ||६||

महाद्वारातूनी करत प्रवेश

वाटले मनास महासौख्य ॥७॥

पांडुरंग मूर्ति देखोनी पवित्र

संतोषले नेत्र इंद्रियेसी ||८||

केली प्रदक्षिणा महाहर्षयुक्त चित्त

हे विरक्त करूनिया ||९||

वाटे मनामाजी राहावे येथेची परी

प्राक्तनाची दशा नाही ।। १०॥

जीव जावो परी पंढरीचे स्थळ न

संडावे जळ ऐसे वाटे ।।११।।

बहेणि म्हणे पंचरात्री पंढरीस केला

आम्ही वास पुण्ययोगे ।।१२।।



१०

चैत्रपौर्णिमेस गेलो महादेवा

देव-यात्रा सर्वा पाहाविले ॥१॥

जाले समाधान देखोनी शंकर

मागे अभयकर भक्तियोगे ।।२॥

पंचरात्री तेथे क्रमोनिया जाण

सिंगणापूर स्थान तेथे आलो ।।३।।

कोरान्नीचे कण सहज मेळ ।

तेणे सुखी जीउ होय माझा ।।४।।

अमृताचे परी वाटे गोड अन्न ।

पाप जळे जाण भक्षिलिया ॥५॥

बहेणि म्हणे माझे वय वर्ष नव ।

जाले आंतर्भाव सांगितला ॥६॥



११

प्रतार विचारी सर्वांस विचार

राहावया थार येथे नाही ।।१॥

ब्राह्मणाचे गावी जाउनी राहावे ।

ऐसे मनोभावे वाटतसे ।।२।।

रहेमतपुरी आहे ब्राह्मणसमुदाय

येथे वस्ती ठाय सर्व करू||३||

बहेणि म्हणे पूर्व-प्राक्तनाचे  योग ।

न सोडी स्थळ त्याग केलियाही ||४||



१२

रहेमतपुरी सर्व जाउनी राहिलो

आवघीच लागलो मिक्षा करू ।।१।।

प्रतार तो थोर स्नानसंध्या करी ।

देव तयावरी कृपावंत ||२||

तेथील उपाध्या ग्रामीचा ग्रामस्थ

जावया उदित वाराणसी ||३||

ग्रामीचा वेवहार चालावयालागी

भ्रतार विभागी केला तेणे ||४||

आपण काशीस जाऊनी तुम्हासी

उपाध्या ज्योतिषी रत्नाकर ||५||

देखोनी नेटका शहाणा विद्यावंत

सर्वही गृहस्थ तथा पुसे ।।६।।

तेही केले मान्य मग तेथे राहो ।

वरुपाचा निर्वाहो येथे जाला ॥७॥

त्यावरी तो जाण आलीया ग्रामासी

रक्षिले आम्हासी वर्ष येक||८||

ऐसे वरुष अकरा जालीया

मजलागी वाटे संतसंगी असावेसे ||९||

कथा आइकावी पुराण-श्रवणी ।

ब्राह्मणपूजनी चित्त रिझे ।।१०।।

तेथुनी प्राक्तने बोढोनिया जाण ।

ते स्थळ त्यागून चालिपेलो ।।११।।

उदास आंतर नायडेथि काही

प्राक्तनासी नाही उपाय तो ।।१२।।

बग म्हणे पुढे कोल्हापूर क्षेत्र

जे अति पवित्र तेथे गेलो ।।१३।।



१३

हिरंभट एक ब्राह्मण वेदांती ।

दोही शाखी गती बजुर्वेदी ।।१।।

धोर भाग्यवंत पवित्र अग्रिहोत्र ।

विद्यार्थी सर्वत्र पठन करिती ॥२॥

तयाचिये गृही पाहोनिया स्थळ ।

राहोनी निश्चल अवण होय ॥३॥

“जयराम गोसावी” त्याची हरिकथा

नित्य भागवता श्रवण करू||४||

बहेणि म्हणे तेथे करोनिया वास ।

सदा निजध्यास आत्मचर्चा ॥५॥



१४

कोहि येक येळे अकराच्या ।

चरुषात सोमवारी व्रत धोर आले ॥१॥

हिरंभट यासी गोदान दिधले ।

द्विमुखी पाहिले यजमाने ॥२॥

काळी ते कपिला काळे तिचे ।

वस्त्र (वच्छ)प्रदक्षणे पुच्छ निवेदिली ||३||

सुवर्णाची शृंगे रुपियाचे खूर ।

वर पीतांबर पांघुरिला ॥४॥

सर्व उपचारे गोदान दिले ।

पाहावया आले सर्व जन ॥५॥

उपजोनिया यत्स गाय मेली परा ।

वत्स पीत क्षीरा दोहाचिया ।।६।।

जाले दिवस दहा अकराव्या दिनी

हिरंभटा-स्वप्नी द्विज बोले ||७||

ब्राह्मण हा तुझे आहे वोसरीस ।

कपिला तयास निवेदिजे ||८||

स्वप्न परी साचे केले हिरंभटे ।

प्रतारासी निष्ठे गाय दिल्ही ||९||

आनंदले मन सर्वांचेही जाण ।

गाई सुश्रूषण घडे आम्हा ॥१०॥

नित्य मायबाप जाती तृणालागी ।

पाळिती प्रयोगी जाण तोपे ||११||

गाईंचे ते वत्स तेही पै कपिला ।

माझ्या ठाई तिला हेत बहु॥१२॥

मीच सोडी तरी वत्स रिघे दोहा ।

करिता दोहावा सवे माझी ||१३||

मीच पाणी पाजी तृण घाली मीच

मजविण कांच मनी वाहे ।।१४।।

भी जाय पाणिया बोरडे ते वत्स ।

गाय बाय पुच्छ सवे चाले ।।१५।।

करुनीया लोक नवलची राहाती ।

उगेच पाहाती वत्स गाई||१६||

मोकळेचि वत्स असोनिया जाण न

बचे आपण गाईपाशी ।।१७।।

तृण घाली तरी भक्षिती आपण ।

पाजिल्या जीवन तेव्हा पिती ।।१८।।

रात्रीच्या अवसरी वत्स निजे सेजे ।

पुराणी ते फुंजे श्रवणकाळी ।।१९।।

कथेपासी जाय सवे तेहि येत ।

उभेची निवांत कथा ऐके ।।२०।।

गाय गोठा घरी आपण कथेसी

जाता मी स्नानासी सवे चाले ।।२१।।

करिती अपूर्व हे तुझे समंधी ।

लोक नाना शब्दी बोलताती ।।२२।।

कोण्ही म्हणे आहे योगभ्रष्ट वत्स ।

कोणी म्हणती नष्ट सवे इची ||२३||

कोण्ही म्हणती जन रिणाइन ।

इथे रीण फिटे तिचे तेच सुटे ||१४||

ऐसे नानापरी बस से न सोडी ।

मजही ते आवडी तयापासी ।।२५।।

न देखता वत्स हितु तळमळी ।

उदकेवीण मासोळी तेसे वाटे ।।२६।।

दळिता कांडिता वाहाताही पाणी ।

वत्सेविण जनी नावडे हो। २७।।

प्रतार रागीट नावडे की तथा ।

परी त्यासी माया मनी आली ।।२८।।

म्हणे असो तुज नाही मूलबाळ ।

हाचि तुझा खेळ जाण मनी ।।२९।।

तुजही आवडी कथा- पुराणाची

संगती फुकाची तुज जाली ॥३०॥

तव तये वेळे जयराम गोसावी ।

तेथे तो स्वभावी सहज आले ।।३१।।

कथा घरोघरी ब्राह्मणाची पूजा ।

संतर्पणे द्विजा आरंभिली ||३२||

रात्री कथा होती दिवसाही करिती ।

मायबापे प्रीती पाहाती ते ।।३३।।

तेथे तया संगे मीही जाय कथे ।

वत्सही ते तेथे सवे चाले ||३४||

जेथे वैसे माय तेथे मी आपण

वत्सही धावोन सवे उभे ।।३५।।

हागेना ते मुते उभेचि श्रवणे ।

आइके कीर्तन नामघोष ।।३६।।

आरती जालिया नमस्कार होती ।

आपणही क्षिती ठेवी डोके ।।३७।।

देखोनीया जन हासती सकळ ।

परि ते प्रेमळ आल्हादची ||३८||

म्हणती योगभ्रष्ट पूर्वील हरिभक्त ।

गोवेष विरक्त पहा कैसे ।।३९।।

तव येके दिवसी मोरोपंते कथा ।

करावया भक्ता पाचारिले ।।४०।।

दिवस येकादशी प्रहरा दो ।

हरिकथा मांडिली तत्त्वत्ता महानंदे ।।४१।।

जयराम गोसावी शिष्य-समुदायेसी ।

बैसला सभेसी आसनी ते ।।४२।।

टाळ मृदंगेसी होतसे गायन ।

मिळालेसे जन सर्व तेथे ||४३||

तेथे आपणही मायबाप बंधू ।

कथा परमानंदू पाहातसे ।।४४।।

समागमे वत्स मजपासी बैसले ।

लोकी त्यासी नेले दारवंटा ।।४५।।

म्हणती स्थळ नाही बैसावया जना ।

पशू हे श्रवणा काय योग्य ।।४६।।

मी रहो लागले वत्सालागी तेथे ।

तब झाले श्रुत गोसाविया ।।४७।।

वोरडता वत्स मज येथे रडता

सांगती अवस्था स्वामीपासी ।।४८।।

म्हणती येक मुली हिरंभटाघरी ।

ते आली श्रीहरी कीर्तनासी ।।४९।।

तिजसवे येक वत्स असे त्यासी ।

सांगाते तयासी हिंडविते ।।५०।।

ते वत्स बाहेरी घातिले अडचणी ।

त्यालागी ते रुसुनी रडत असे ।।५१।।

ते वत्स आरडत बाहेरी तिष्ठते ।

रडत हे येथे गलबला ||५२||

साक्ष अंतरीचा तो स्वामी जयराम ।

वत्स-आंतर्याम वोळखिले ॥५३॥

म्हणे आणा त्यासी वत्साचे आंतरी ।

काय नाही हरी आत्मवेत्ता ।। ५४॥

कथेलागी होतो जीव कासावीस ।

पशू की तयास म्हणो नये” ।।५५||

आणविले वत्स बैसविले आसनी ।

पाहोनी नयनी तोष वाटे ।।५६।।

मजही कृपावंत कृपेचिये शब्दे ।

बोलावी प्रारब्धे पूर्व-पुण्ये ।।५७।।

कुर्वालोनी दोघा पाहे पूर्ण दृष्टी ।

न मानेचि गोष्टी जनालागी ।।५८।।

कथा होत असे गजर महाथोर ।

चित्त हे निर्भर वैष्णवाचे ।।५९।।

तयराम गोसावी याचे मनोगत ।

पुण्यसीळ सत्य उभयवर्गे ।।६०॥

कथेमाजी वत्स उमेचि तिष्ठत ।

रूपी सर्व चित्त आणुनिया ।।६१।।

हे मुली लहान वय इचे थोडे श् ।

रवण हे आवडे नवल मोठे ॥६२॥

म्हणे इचे कोण्ही आहे ये कबेसी ।

मायबाप तिसी सांगितला ॥६३॥

भ्रतारही इचा आहे बहु योग्य ।

परि इचे वैराग्य थोर दिसे ।।६४।।

मायबापासवे येतसे पुराणी

वत्सही घेउनी समागमे ॥६५॥

मग म्या आपुले आपण पाहिले

चरणी घातले लोटांगण ।।६६॥

वत्सही तैसेची पायावरी पडे ।

अपूर्वता पडे सर्व जना ।।६७।।

वाम सव्य दोन्ही होतो दोघे जण

चत्सा मज तेणे उठविले ।।६८।।

कथा संपलिया लोक गेले सर्व ।

परि हे अपूर्व म्हणती जन ।।६९।।

हिरंभट आणि आणिकही जन ।

म्हणती हे चिन्ह कोण कळा ॥७०॥

बहेणि म्हणे ऐसे कोल्हापुरी होये ।

पुढीलहि सोय तुम्हा सांगो ।।७१।।



१५

पिता-माता-बंधू-समवेत बिन्हाडी |

पावले से ही वत्सयुक्त ।।१।।

दोन घटिका रात्री होती समई ।

वत्स तये गाई पाजियेले ॥२॥

हिरंभटी स्नान केले अग्नीसवे |

कार्तिकाचे दिवे आकाशात् ॥३॥

सडे संमार्जन केले स्नान तेथे |

गौचे शृंग हाते कुवांळिले ||४||

भ्रताराने स्नान केले आपुलिया |

दक्षिणेची गया कोल्हापूर ||५||

तव कोण्ही एक निराबाई होती

तिने कथास्थिती सांगितली ।।६।।

प्रताराचे कानी कथेतील सर्व |

सांगाया अपूर्व म्हणोनिया ।।७।।

यत्साचे वृतांत माझेही रुदन भ्

रताराचे कान तृप केले ||८||

जयराम गोसावी विदेही अवस्था ।

तेणे हात माथा ठेवियेला ||९||

थोर याचे भाग्य तो यासी बोलिला ।

आशीर्वाद दिल्हा योग्य तेथे ||१०||

जातीचा भिक्षुक आला ।

बहुत रागावला गृहप्रती ।।११।।

धरूनिया वेणी मारिले यथेष्ट ।

हिरंभटा कष्ट फार जाले ।।१२।।

नावरे मारिता गायही थोरडे ।

वत्सही ते रहे कासाविस ।।१३।।

अठराव्या वरुषात मज होते तेथे ।

काय मी की सेवा आंतरले ।।१४।।

मायबाप बंधू न बोलती काही ।

भ्रतारे क्रोधही आवरिला ।।१५।।

शांत जालियाने पुसती तयास । स्

त्रियेवरी त्रास कासयाचा ।।१६।।

येरु म्हणे रात्री कथेत प्रतिष्ठा ।

काय यांची निष्ठा देखियेली ।।१७।।

कैचे हे पुराण कैची हरिकथा ।

मारीन अन्यथा नव्हे येथ ।।१८।।

इतुके बोलोनिया भ्रतार पुनरपि ।

क्रोध तो नाटोपी अनिऐसा ।।१९।।

बहेणि म्हणे तेव्हा देह संकल्पिले ।

प्राक्तनाचे केले कोण वारी॥२०॥


१६

आले मना तव मारिले बळकट ।

बांधोनिया मोट टाकियेली ॥१॥

हिरंभट म्हणे व्हा तुम्ही बाहेरी ।

हा दिसे हत्यारी चांडाळ की ।।२।।

मग मातापिता हिरंभटालागी ।

प्रार्थनिया वेगी स्थिर केले ||३||

म्हणती कृपा करा आजि दिसभरी ।

प्रातःकाळी दुरी ठाव पाहो ।।४।।

तयावरी वत्स गाय दोघे जण न

खाती की तृण जळेसहित ।।५।।

देखोनी वत्सासी गाईंचा वृत्तांत

मोट तो सोडित तये वेळी ।।६।।

आणिले जवळी गाई वत्सापासी ।

हुंबरली जैसी पुत्र माता ||७||

आपण देखिले वत्स आणि गाय |

म्हणे प्राण जाय तरी बरा ।।८।।

बहेणि म्हणे तया तृण पाणी पाजी |

न घेती ते माझी थोर माया ।|९||


१७

न खाती ते तृण न घेती जीवन

आपणही अन्न टाकियेले ।।१।।

नुठती सर्वथा स्वस्थळापासुन

येती सर्वजन पाहावया ।।२।।

जयराम स्वामीस सांगितले जनी

पाहावया निर्वाणी तेही आले ॥३॥

भ्रतारे तयासी केला नमस्कार ।

आपुले आंतर एकनिष्ठ ||४||

घातले आसन जयराम स्वामीस

हिरंभटी त्यास पूजियेले ।।५।।

मिळोनिया लोक पाहाती लोचनी ।

स्वामीही ते क्षणी आनंदले ।।६।।

म्हणती “ब्राह्मणा तू इचा भ्रतार

सांगतो निर्धार ऐक चित्ते ।।७।।

योगभ्रष्ट इची साधने बळकट ।

तू रे ईस कष्ट करू नको ॥८॥

स्वधर्मेची तुझी करील हे सेवा ।

उद्धरील जीवा आपुलिया ॥९॥

तुझे काही पदरी पूर्वील सुकृत ।

तेणे हा सांगात प्राप्त जाला ।।१०||

गाई आणि वत्स हे इचे सांगाती ।

अनुष्ठानी होती ऐक्यभावे ।।११।।

इचा हेच गुरु हे इचे साधन ।

तोडील बंधन आपुले हे ।।१२।।

इच्या समागमे करिती जे वास ।

तेही भक्तिरस घेती सुखे ।।१३।।

आइकसी तरी बरे होय तुझे

येथे काय माझे बळ आहे” ।।१४।।

बहेणि म्हणे ऐसे बोलोनी जयराम ।

पाहे मनोरम सर्व चिन्हे ।।१५।।


१८

स्वस्थाना आपण चालिले जयराम ।

शिष्यांचा संभ्रम फार होता ।।१॥

म्हणती जयराम “आनुष्ठानी तिघे ।

पूर्विल्या प्रसंगें एकनिष्ठ ।।२।।

आंतराय काही आनुष्ठानी राहिल्या ।

गायी या जन्मल्या पुण्यवेषे ||३||

हे मुली संपूर्ण आहे आनुष्ठान ।

चित्तशुद्धि जाण ईस आहे” ||४||

ऐसे परस्परे बोलती उत्तरे हे ।

कानी सादर आईकिली ॥५॥

बहेणि म्हणे गेले स्वामी स्वस्थानासी ।

मागील वृत्तांतासी जाण सांगो ॥६॥


१९

द्वादशी क्रमोनी त्रयोदशी आत

वत्सासी देहान्त समय आला ।।१।।

तेथ हिरंभट बोलियेला श्लोक ।

सहज स्वाभाविक ‘मूकं करोति’।।२।।

पूर्वार्ध श्लोकाचा सरताचि जाण

बोलिले आपण वत्स तेव्हा ॥३॥

‘यत्कृपा तमहं वंदे’ बोले शब्द ।

श्लोक- उत्तरार्ध वत्स बोले ||४||

आइकिला सर्व लोकी तो श्लोकार्थ ।

करिती संवाद परस्परे ।।५॥

तव त्या वत्से टाकियेला प्राण ।

आले मी धावोन तयापासी ॥६॥

प्राणासवे प्राण जाऊ पाहे माझा ।

प्राक्तनासी दुजा प्रयत्न नाही ।।७।।

गाय हुंबरडे दोहीवरी मान

टाकी परी जाण शब्द कैचा ।।८।।

बहेणि म्हणे देह प्राक्तनें राखिले

पुढे काय जाले कोण जाणे ।।९।।


२०

जयराम स्वामीस कळला वृत्तांत ।

वत्सासी त्या अंतकाळ जाला ।।१।।

श्लोकार्थ म्हणोनि प्राण वत्स त्यजी ।

 लाजला जी तयापुढे ।।२।।

मग सर्व श्रेष्ठ संत साधुजन

करीत कीर्तन वत्स नेले ॥३॥

दिंडी पताकाने मिरविले वत्स ।

गाय सवे तुच्छ मानी देह ||४||

हुंबरडा हाणोनी चाले मागे

मागे गाय अंतरंगे महादुःखी ॥५॥

पुरूनिया वत्स आले सर्व जन

करूनिया स्नान गृहा गेले ।।६।।

गाय वत्सापासी जाउनी हुंबरे

मागुती ते फिरे गृहासी ये ॥७॥

मज अवलोकिता मी तो अचेतन

माझा देही प्राण आढळेना ||८||

ऐसे दिवस चारी लोटलियावरी ।

प्रतिपदेमाझारी मध्यरात्री ॥९॥

बोलिला ब्राह्मण येऊनी सन्मुख

“सावध विवेक धरी बाई ।।१०।।

सावध सावध सावध तू मनी”।

ऐकोनी श्रवणी देह कापे ||११||

तब गाय नाही वत्स ना ते लोक

माय ते सन्मुख बैसलीसे ||१२||

बंधू पिता आणि प्रतार बैसला ।

सोज्वळ लागला दीप असे ||१३||

तेथुनिया मन करोनी सावध स्

मरणी स्वतः सिद्ध चित्त केले ||१४||

बहेणि म्हणे देह सर्वही विकळ ।

परि ते निश्चळ चित्त माझे ।।१५।।


२१

उघडोनिया नेत्र पाहे जब पुढे ।

तब दृष्टी पडे पांडुरंग ॥१॥

देखिली पंढरी ध्याना तेचि येत ।

जयराम दिसत दृष्टीपुढे ।।२।।

ब्राह्मण स्वप्नात देखिला तो जाण ।

त्याची आठवण मनी वाहे ।।३॥

न दिसे आणिक नेत्रांपुढे जाण ।

नामाचे स्मरण मनी राहे ||४||

पूर्वील हरिकथा आइकिल्या होत्या

त्या मनी मागुत्या आठवती ॥५॥

तुकोबाची पदे अद्वैत प्रसिद्धे ।

तयांच्या अनुवादे चित्त झुरे ।।६।।

ऐसी ज्याची पदे तो मज भेटता ।

जीवास या होता तोष बहू ||७||

तुकोबाचा छंद लागला मनासी ।

ऐकता पदांसी कथेमध्ये ||८||

तुकोबाची भेटी होईल तो क्षण

वैकुंठासमान होय मज ॥९॥

तुकोबाची कानी ऐकेन हरिकथा ।

होय जैसे चित्ता समाधान ।।१०।।

तुकोबाचे ध्यान करूनि अंतरी ।

राहे त्याभीतरी गृहामाजी ।।११।।

बहेणि म्हणे तुका सद्गुरु सहोदर ।

भेटता अपार सुख आहे ।।१२।।


२२

मच्छ जैसा जळावाचुनी चरफडी

तैसी ते आवडी तुकोबाची ।।१।।

अंतरीचा साक्ष असेल जो प्राणी ।

अनुभवे मनी जाणेल तो ।।2।।

तृषितान जैसे आवहे ।

जीवन सायण विगतया ॥३॥

बहे म्हणे हेत तुकोबाचे पायी ।

ऐकोनिया देही पदे त्याची ॥४॥


२३

संचितासी दग्ध करी ऐसा कोण

सद्गुरुवाचून जाण मना ||१||

यालागी सद्गुरू असावा उत्तम

जेणे निमे श्रम संसाराचा ||२॥

त्रिविध तापासी कोण करी शांत

सद्गुरू येकांत न जोड़ता ||३||

जन्ममरणाची कथा के निवारे ।

सद्गुरू निर्धारि न भेटता ॥४॥

वासना निःशेष निवारील तेव्हा

भेटेल तुकोबा सद्गुरू तो ॥५॥

बहेणि म्हणे माझा जाऊ पाहे

जीव का पा न ये कीव तुकोबा रे।।६।।


२४

न बोलवे शब्द अंतरिचा धावा ।

नाइके तुकोबा काय कीजे ||१||

अदृष्ट करंटे साह्य नव्हे देव ।

अंतरीची हाव काय करू ||२||

तेरा दिवस ज्याने चहिया उदकात

घालुनिया सत्य वाचविल्या ||३||

मन्हाष्ट्र शब्दात वेदांतिचे अर्थ ।

बोलिला लोकात सर्वद्रष्टा ॥४॥

आंतर साक्ष आहे निरोपणी हेत ।

जडे परी चित्त वोळखेना ||५||

बहेणि म्हणे मीच असेन अपराधी ।

अन्याय त्रिशुद्धी काय त्याचा ||६||


२५

बहुत अंतरी शोक आरंभिला ।

का मज विठ्ठला मोकलिले ।।१।।

त्रिविध तापाने तापले मी बहू ।

जाईना का जीऊ प्राण माझा ॥२॥

तव अकस्मात सातवेया दिनी ।

नामसंकीर्तनी घोषयुक्त ।।३।।

तुकारामरूपे येउनी प्रत्यक्ष ।

म्हणे पूर्वपक्ष सांभाळिजे ||४||

नको करू चिंता आहे मी ।

तुजपासी घेई अमृतासी हातीचिया ॥५॥

गाय केले वत्समुखी निये धार ।

अमृत हे सार सेवी हेवी ||६||

ठेउनिया कर मस्तकी बोलिला ।

मंत्र सांगितला कर्णरंध्री ॥७॥

म्याही पायावरी ठेविले मस्तक ।

दिधले पुस्तक मंत्र गीता ।।८।।

कार्तिकात वा पंचमी रविवार ।

स्वप्नीचा विचार गुरु कृपा ॥१॥

आनंदले मन चिप कोंदले ।

उठोनिसले चमत्कारे ।।१०।।

मंत्र आठवती तुकोबास्वरूये ।

स्वप्नामाजी कृपा पूर्ण केली ।।११।।

अमृत पाजिले चयी अनारसी ।

साक्ष ज्याची त्यासी मनामाजी ।।१२।।

बहेणि म्हणे ऐसी कृपा सद्गुरूची ।

तुकारामे साची पूर्ण केली ।।१३।।


२६

जाले समाधान ब्राह्मणाच्या शब्दे ।

स्वप्नामाजी पदे आठवती ॥१॥

परी अंतरीच तुकोबाचे ध्यान ।

दर्शनावाचून करितसे ॥२॥

जयाचिया पदे होतसे विश्रांती ।

त्याची देहाकृति बची ।।३।।

बिलासी तया नाही भेदभाव ।

ऐसे माझे मन साक्ष आहे ||४||

पांडुरंग तुका पांडुरंग तुका ।

वेगळीक देखा केवी होय ॥५॥

कलियुगी बीध्यरूप हरी हरी ।

तुकोबा-शरीरी प्रवेशला ॥६॥

तुकोबाची बुद्धि पांडुरंगरूप ।

मन ते स्वरूप तुकोबाचे ।।७।।

तुकोबाची सर्व इंद्रिय-चालक ।

पांडुरंग देख सत्य आहे ||८||

तुकोबाचे नेत्र तेही पांडुरंग ।

श्रोत्र ते अभंगरूप त्याचे ।।९।।

तुकोबाचे हात लिहिताती जे जे ।

ते ते ते सहजे पांडुरंग ।।१०।।

सर्वही व्यापार तुकोबाचे हरी ।

आपणचि करी अद्वयत्वे ।।११।।

वणि म्हणे रूपे व्यापक तुकोबा ।

ध्यान माझ्या जीवा हेचि वाहे ||१२||


२७

भ्रतारे मारिले मोट बांधोनिया न ।

सोसी ते तया क्लेश वत्सा ।।१।।

चतुर्थ दिवशी जीव टाकियेला ।

विठ्ठले दाविला चमत्कार ।।२।।

ब्राह्मणाच्या रूपे येउनी सांगत ।

सावधान चित्त करी पुढे ॥३॥

अंतरी सावध होउनी राहिले ।

चित्त म्या गोविले तुकोबासी ।।४।।

वत्स गेलियाने दिवस सातवा ।

येऊनि तुकोबा स्वप्नामाजी ॥५॥

केले समाधान पाजिले अमृत ।

वत्सासी करीत गाय भेटी ।।६।।

अमृत पाजोनी सांगितला मंत्र ।

जो का हा सर्वत्र लोक जपती ||७||

मस्तकी हस्तक ठेवोनिया कृपा ।

केली त्या स्वरूपा तोची जाणे ॥८॥

कृपेचा महिमा आहे तो अपार ।

वत्स बोले सार श्लोक- अर्ध ।।९।।

आठवे दिवसी सावध इंद्रिये ।

अमृते धालिये तुकोबाच्या ।।१०।।

तेधवा ते गाय देखिली सन्मुख ।

निमालिसी देख बत्तर कळे ।।११।।

म्हणे या वत्साते पाजिले अमृत ।

तयासी तो मृत्य कदा नाही ।।१२।।

अमर ते वत्स आहे मजपासी ।

चित्त अमृतेसी घेत गोडी ।।१३।।

बहेणि म्हणे इतुके वर्तलियावरी ।

पुढेही विस्तारी सांगिजेल ।।१४।।


२८

जयराम समर्थ ज्ञानाचा सागर ।

साक्ष ते अंतर त्याचे तया ।।१।।

बोलाविले तेणे हिरंभटाप्रती ।

माझी तया स्थिति पुसियेली ||२||

सांगितला तेणे वृत्तांत सर्वही ।

वर्तला जो काही गृही त्याचे ||३||

स्वप्नगत गुरू तुकोबाचे रूपे ।

स्वप्नीचिये कृपे बोध केला ||४||

सावध होउनी ते मुली ।

बैसली गाय समोखिली कुर्वानी ||५||

दुग्ध दुहुनिया घेतले तियेने ।

पाणी आणि तृण भक्षितसे ।।६।।

परी ते मुलीचे रूप पालटले ।

पूर्ण ते दाटले हृदय तिचे ।।७।।

तुकोबाचा छंद अंतरी लागला ।

मायबापे तिला सांगताती ॥८॥

भ्रतार हा तिचा वेडावला राहे ।

उगाची तो पाहे तिथेकडे ।।९।।

छांदस होउनी बैसली घरात ।

तुकोबाची चित्त लाउनिया ।।१०।।

ऐसा हा वृत्तांत हिरंभट सांगे ।

जयराम निजांगे संतोषला ।।१।।

बहेणि म्हणे ऐसा निर्धार ऐकोनी ।

जयराम स्वामींनी कृपा केली ।।१२।।


२९

कृपा उपजली जयराम स्वामीसी

आले पहावयासी भाव माझा ।।१।।

देखोनी तयासी आनंद वाटला

कंठ कोंदटला आनंदाने ।।२।।

मनेचि आरती केला नमस्कार ।

पुजिला साचार मनामाजी ।।३।।

बहेणि म्हणे माझे मनातील

तो निश्चित पांडुरंगा ॥४॥


३०

मजवरी दृष्टी कृपेची वोतली

प्रेमाची गुंतली माय जैसी ।।१।।

अंतरीची पूजा घेऊनी जयराम

गेला तो सप्रेम स्वस्थानासी ॥२॥

उगाची बैसला आसनी नेमस्त ।

करुनिया स्वस्थ चित्तवृत्ति ।।३॥

तव काही एक अपूर्व वर्तले ।

तुकारामे दिल्हे दर्शनासी ||४||

करी नमस्कार भेटुनी आनंदे

अत्यंत आल्हादे स्वामी सखा ||५||

मजही दरुषण दिधले

आळुमाळ घातला कवळ मुखामाजी ॥६॥

मज म्हणे “आलो जयराम भेटीसी ।

तुजही मानसी वोळखिले ||७||

तुम्ही आता येथे नका राहो

कदा आत्मज्ञानबोधा न संडावे” ||८||

बहेणि म्हणे दिल्हे दर्शन दुसरे ।

मनाच्या व्यापारे तुकोबाने ।।९।।


३१

नवल जनासी वाटले म्हणोनी

येती ते धावोनी पाहावया ॥१॥

भ्रतार हा माझा देखोनी तयासी ।

माझिया देहासी पीडा करी ।।२।।

न देखवे तथा द्वेषी जनाप्रती ।

क्षणाक्षणा चित्ती द्वेष वाढे ||३||

म्हणे ही बाईल मरे तरी बरी

ईस का पामरे भेटताती ॥४॥

काय आता घुमे येईल आंगासी

देव इचे पोसी पोट कैसे ॥५॥

बहेणि म्हणे ऐसी भ्रतारासी चिंता ।

जाणोनी अनंता कळो आले ।।६।।


३२

अतार म्हणतसे आम्ही की ।

ब्राह्मण वेदाचे पठण सदा करू ॥१॥

कैचा शूद्र तुका स्वप्नीचे दर्शनी ।

बिघडली पत्नी काय करू ॥२॥

कैचा जयराम कैचा पांडुरंग ।

माझा झाला भंग आश्रमाचा ॥३॥

आम्ही काय जाणो नाम हरिकथा ।

भक्ति हे तत्त्वता नसे स्वप्नी ॥४॥

कैचे संतसाधू कैची भावभक्ती ।

भिक्षुकाचे पंगति वसो सदा ॥५॥

बहेणि म्हणे ऐसे चित्तात भ्रतारे ।

चिंतोनी निधारे विचारिले ||६||


३३

विचारिले मनी भ्रतारे आपण  ।

आता हे त्यागून वना जावे ।।१।।

इस नमस्कार करितील जन  ।

आम्ही ईस तृण वाटो परी ॥२॥

खियेसी बोलती अनुवाद कथेचा  ।

आम्ही परि नीच ईस वाटू ||३||

पुसतची येती ईस पहा जन  ।

आम्ही की ब्राह्मण मूर्ख जालो ॥४॥

इचे नाव घेती गोसावीण ऐसे  ।

आम्हा कोण पुसे इंजपुढे ||५||

बहेणि म्हणे ऐसे भ्रतार मानसी  ।

चिंतुनी चित्तासी बोध करी ॥६॥


३४

म्हणे आता मना स्त्रियेची हे दशा

आता तू सहसा राहो नको ।।१।।

चाल वेगी जाऊ तीर्थासी वैराग्य ।

आमचे हे भाग्य वोडवले ॥२॥

सासू-सासरियास केला नमस्कार

आहे खी गरोदर मास तीन ॥३॥

आपण जातो तीर्थयात्रा करावया

देवलसी खिया यत्न कीजे ॥४॥

न पाहे मी मुख सर्वथा इयेचे ।

हीनत्व आमुचे कोण फेडी ।।५॥

भंडिमा सोसून कोण राहे येथे

ऐसिया खियेते कोण पाळी ।।६।।

बहेणि म्हणे ऐसे बोलिला भ्रतार ।

मज पडे विचार मनामाजी ।।७।।


३५

काय म्या अदृष्टा करावे आपण ।

आले जे ठाकून सोसी येथे ॥१॥

नाही येत वारे आंगासी माझीया ।

घुमारीन काया नव्हे माझी ॥२॥

स्वधर्म आपुला रक्षनिया मने ।

शास्त्राच्या श्रवणे देव साधू ॥३॥

भ्रताराची सेवा तोचि आम्हा देव ।

भ्रतार स्वयमेव परब्रह्म ।।४।।

तीर्थ भ्रताराचे सर्वतीर्थ जाण ।

तया तीर्थावीण निरर्थक ॥५॥

भ्रतारवचनासी उल्लंघीन जरी ।

पापे माझ्या शिरी पृथिवीची ॥६॥

धर्म अर्थ काम मोक्षासी अधिकारी ।

भ्रतार साचार वेद बोले ।।७।।

हा माझा निश्चय मनातील हेत ।

प्रतारेसी चित्त लाविलेसे ॥८॥

भ्रतारसेवेने सांग हा परमार्थ ।

भ्रतारेच स्वार्थ सर्व आहे ||९||

भ्रतारा वाचून अन्य देव ।

जरी येईल अंतरी ब्रह्महत्या ॥१०॥

सद्गुरु प्रतार साधन प्रतार ।

हा सत्य निर्धार अंतरीचा ।।११।।

बहेणि म्हणे देवा भ्रताराचे ।

मनी तुवा प्रवेशोनी स्थिर केले।।१२।।


३६

भ्रतार गेलिया वैराग्य घेउनी ।

पांडुरंगा जनी जिणे काय ।।१॥

प्राणेविण देह काय पावे शोमा ।

रात्री- विण प्रभा चंद्राचिये ॥२॥

प्रतार तो जीव देह मी आपण ।

प्रतार कल्याण सर्व माझे ॥३॥

प्रतार जीवन मी मच्छ तयात ।

कैसेनी वाचत जीव माझा ॥४॥

भ्रतार तो रवी मी प्रभा तयासी ।

वियोग हा त्यासी केवी घडे ॥५॥

बहेणि म्हणे माझ्या जिवाचा निर्धार ।

बोले में विचार हरी जाणे ॥६॥


३७

भ्रतारे वैराग्य घेतलिया वरी ।

जीव हा निर्धारी देईन मी ।।१।।

वत्सासाठी देह अचेतन

पडे हा तय रोकडे परब्रह्म ॥२॥

भ्रताराचे तीर्थ न सापडे जरी

अन्न खाय तरी मांस आम्हा ॥३॥

भ्रताराचे शेष न सापडे तरी

पापे माझ्या शिरी त्रैलोक्याची ॥४॥

चित्त हे भ्रताराविण जरी जाये

तरी केवी राहे प्राण माझा ॥५॥

भ्रतारदर्शनाविण जाय दीस ।

तरी तेचि रासी पातकाच्या ॥६॥

बहेणि म्हणे मज आज्ञाची प्रमाण

ब्रह्म सनातन स्वामी माझा ॥७॥