समर्थ रामदास स्वामी आरती
samarth-ramdas-swami-aarti
|| समर्थ रामदास स्वामी आरती ||
समर्थ रामदास स्वामी

|| समर्थ रामदास स्वामी आरती ||
आरती रामदासा || भक्त विरक्त ईशा |
उगवला ज्ञानसूर्य ||उजळोनी प्रकाशा || धृ ||
साक्षात शंकराचा |अवतार मारुती |
कलिमाजी तेचि झाली |रामदासाची मूर्ती || १ ||
वीसही दशकांचा |दासबोध ग्रंथ केला |
जडजीवां उद्धरिले नृप शिवासी तारीले || २ ||
ब्रम्हचर्य व्रत ज्याचे |रामरूप सृष्टी पाहे |
कल्याण तिही लोकी |समर्थ सद्गुरुपाय || ३ ||आरती रामदासा ||