कर्पूरारती
karpuraarti-ganapati-shloka-diparati-dhuparat
|| कर्पूरारती ||
कर्पूरगौरा । करुणावतारा ।
संसारसारा । भुजगेन्द्रहारा ।।
सदा रहासी हृदयारविंदीं ।
भवा भवानीसह तूज वंदीं ।।
गणपति श्लोक
|| गणपति श्लोक ||
ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे ।
कविं कविनां उपम श्रवस्तमम् ।
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः ।
शृण्वन् ऊतिभिः सीदसादनम् ।।
दीपारती

|| दीपारती ||
जय देव जय देव जय पांडुरंगा । दीपारति ओवाळूं तुजला जिवलगा ।। धृ ।।
स्वयंप्रकाशा तूझी सर्वही दीप्ति।। पूर्णानंद प्राप्त करितां तव भक्ति ।।
देहत्रय वाती पाजळोनी प्रीती । ओवाळितों प्रेमें देवा तुजप्रती ।।१।।
देव तुज पाहता येतो प्रेमपूर । नाम निरंतर गातां होतो भवपार ।।
वाटे तव भक्ती ही प्रियकर । विष्णुदासा देई अखंड हा वर || २ ||
धूपारती
|| धूपारती ||
जय देव जय देव पंढरीराया । धूप अर्पीतसें मी भावें तव पायां ।। धृ ।।
सोज्ज्वळ अग्निरूप निजतेजोराशी । अहंभाव धूप कृपें जाळीसी ।।
त्याचा आनंद माझे मानसीं । तव दर्शनमोदें सुख हें सर्वांसी ।। १ ।।
पूर्णानंद देवा तूं सच्चिदानंदा ।परमात्मा तूं अससी आनंदकंदा ।।
पूर्ण करीं तूंची भक्तांच्या छंदा । अंगीकारुन धूप दे ब्रह्मानंदा ।। २ ।।
घालिन लोटांगण
|| घालिन लोटांगण ||
घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन । भावे ओवाळिन म्हणे नामा ।।
त्वमेव माता पिता त्वमेव । त्वमेव बन्धुः सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ।।
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा । बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।
करोमि यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेती समर्पयामि ।।
अच्युतं केशवं राम नारायणम् । कृष्णदामोदरं वासुदेवं भजे ।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम् । जानकीनायकं रामचंद्रं भजे ।।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।
।। मंगलमुर्ती मोरया ।।
।। गणपतिबाप्पा मोरया ।।