अभंग ,जनार्दन स्वामी

जनार्दन स्वामी अभंग – १

चहुं युगामाजीसिद्ध संत झाले ।
योगेंचि तरले होती तेही ॥१॥
नोहेंचि उद्धार राजयोगे वीण ।
घाले राम कृष्ण हरि हर ॥२॥
योगेंचि ते मुक्त शुकसनकादिक ।
नारद जनक शिव उमा ॥३॥
राजयोगी पुर्ण स्वामी दत्तात्रेय ।
जनार्दना दावी सिद्धमार्ग ॥४॥
योगेंनि साधक झाले स्वयें देव ।
जाणती वैष्णव स्वानुमवी ॥५॥

janardhan-swami-abhang

कवण चौपुडें तेथं सुरनर ।
न येचि ढेंकर तृप्तीविण ॥६॥
अनुभवें तेंचि होवोनिया आपण ।
स्थापिती कर्म ज्ञान भक्ति नाम ॥७॥
नेणोनि उद्धोध वेति भ्रम मुढ ।
आवडे तें वाड म्हणती हेंचि ॥८॥
धिक्कारिती विषय झाल्या गर्भ स्थीर ।
त्यागों नये घराचार म्हणुनी येरी ॥९॥
योगेविण प्राप्त कैवल्य तया नाश ।
बाह्मनामें ओस भक्ति ज्ञानें ॥१०॥

नलमे अक्षयसुख केलियांही कांहीं ।
व्यर्थनाम तें ही योगेविण ॥११॥
यागेंची होवोनि जपती तें नाम ।
नारदा वाल्मीक व्यास शीव ॥१२॥
न येता रुपासी आधी कैचें नाम ।
लक्षोनि श्रीराम गावें तया ॥१३॥
योगेंवीण नाहीं स्त्रियां पुरुषां गती ।
न चुके अधोगती करिता सर्व ॥१४॥
म्हणोनि गुरुसी व्हावें सर्वस्वे अर्पण ।
खेचरा शरण नाम ॥१५॥
म्हणे जनार्दन सावध हो उठी ।
उघडी भ्रम तो एकनाथ ॥१६॥

लाभोनी हा जन्म मंत्रे कां फसावें ।
आंतचि रिघावें शरण गुरुसी ॥१॥
त्यजुनि शास्त्र शंका मान महत्व लज ।
वराव पुन्हा राजयोगीमंत्र ॥२॥
देववावा आधईं कांतेसी मग स्वयें ।
घ्यावा संप्रदाय उपदेश ॥३॥
करो नये विचार जरी आड येती ।
वाळवेही पती माता पिता ॥४॥
बुड्विती स्वहित तेचि साच वैरी ।
नेती यमपुरी पुर्वजेंसी ॥५॥

खोवाव कां तारुं अक्षय ब्रह्मदाता ।
जन्मीचेया कांता पती सर्व ॥६॥
झाले जे अनन्य राजयोगीयांसी ।
नलगे तयासी करणें योग ॥७॥
होवोनि जीवें दासी राजयोगीयाची ।
पावावें पद तें ची तयासंगे ॥८॥
नाहीं भरंवसा आयुष्य बुडबुडा ।
नाशायां बापुडा मग म्हणे ॥९॥
सांगे गुरु तेंचि करावें सर्व देहें ।
हें करी नोहे हें म्हणे नये ॥१०॥

गात्र शक्ती तारुण्य इंद्रिये जंव तंव ।
व्हावे देहें देव नोहे मग ॥११॥
म्हणे जनार्दन सदुरुपायी लोटी ।
उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१२॥


राजयोगेंवीण न कळे ब्राह्मज्ञानें ।
प्रमाणें अनुमानें मेलियांही ॥१॥
पाहोनियां  ग्रंथ केलिया ते खुण ।
न लमें दिल्या प्राण अनंतजन्में ॥२॥
व्रते तपें नेम केलियां पठण ।
प्रतिमा पाषाण पुजिलियां ॥३॥
न लभे जनघमें मत अभिमानें ।
तीर्थ उद्यापनें लक्षकोटी ॥४॥
पढों नये ग्रंथ त्यागावा कुळधर्म ।
न घ्यावें जनकर्म उदाहरण ॥५॥

सेवावें उच्छिष्ठ निर्माल्य गुरुतीर्थ ।
ऐको नये मात कवणांची ॥६॥
न करतां ग्रहण सेवों नये काहीं ।
अर्पावें सकळही श्रीगुरुसी ॥७॥
मानों नयें विटाळ राहों भलतें स्थिती ।
स्पशें दग्ध होती पापें सर्व ॥८॥
जोडती ते मेरू पुण्याचें अगणीत ।
पावन समस्त श्रीगुरुचेनी ॥९॥
दर्शन पूजन गुरुशेषेंवीण ।
सेवन ग्रहण पातकची ॥१०॥

गुरुच्या अमक्तांचें वर्जावें दर्शन ।
निश्चयें पतन तयासंगें ॥११॥
पाहों नये शास्तरें पुराणें चरित्रें ।
करावीं गुरुशास्त्रें पठण नित्य ॥१२॥
नलगे स्मार्त शैव वैष्णवादि मत ।
मेदाभेद व्यर्थ तर्कवाद ॥१३॥
संती सांगितलें तेचि आचरावें ।
व्हावें निज वैष्णवे ज्ञानें निज ॥१४॥
घेवों नयें तर्क दोषादि कल्पना ।
विचार वल्गना वाद शंका ॥१५॥

असो मलतैसे निंद्यही का नीच ।
परी योग्य तेंच करावयां ॥१६॥
श्रीगुरुंचे दास जगीं म्हणवावें ।
नाडले थोर थोर गर्वे अभिमानें ॥१७॥
म्हणें जनार्दन हे तें व्यर्थ आटी ।
उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१८॥


मिरवोनि ज्ञान पसरिती ढोंग ।
निंदिती राजयोग मुर्खपणें ॥१॥
तेचि निःसंशय जाणावे अभक्त ।
तारक एकचि सत्य राजयोग ॥२॥
गुरुचिया दाप्तां लेखिती सामान्य ।
नेणोनि प्रमाण संतांचे तें ॥३॥
सांगतीं मोळियां सर्वाचि श्रेष्ठ मार्ग ।
संती राजयोग वाळिया हें ॥४॥
तयांपाशी स्थीर नोहावें क्षणैक ।
नाशे अक्षयसुख तयां संगे ॥५॥

सद्भावें रिघावें शरण योगियांसी ।
द्यावा पायांपाशी बळी जीव ॥६॥
नेदी संप्रदाय नेम आचरण ।
नोहावें शरण ऐशां काहीं ॥७॥
ऐसियाचा संग झाल्या क्षण एक ।
त्याहुनी नसे पातक ब्रह्माडींहीं ॥८॥
ढळों नये कोणी केलियांही विघ्न ।
साधावें संपुर्ण याचि देहें ॥९॥
हणें जनार्दन सकळ याचिसाठी ।
उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१०॥