भारताचा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला साजरा केला जातो. १९५० साली भारताचे संविधान लागू होऊन देशाला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली, आणि त्यानंतर दरवर्षी हा दिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. या दिवशी भारताच्या लोकशाहीचे प्रतीक असलेले भारतीय संविधान सार्वभौमपणे स्वीकारले गेले.

दिल्लीतील राजपथावर आयोजित भव्य परेडमध्ये भारतीय सैन्य, विविध राज्यांची सांस्कृतिक झांकी, शौर्य पुरस्कार विजेते आणि नागरिकांचा सन्मान करण्यात येतो. या कार्यक्रमांद्वारे देशातील विविधता, एकात्मता आणि संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवले जाते. तसेच, भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील शूर वीरांचा आदर व्यक्त करण्यात येतो.

प्रजासत्ताक दिन हा देशाच्या सार्वभौमत्वाचा, एकतेचा आणि लोकशाही मूल्यांचा प्रतीक असतो. भारतीय संविधानाचे महत्त्व आणि लोकशाहीचे मूल्य या दिवशी पुनःप्रस्थापित होते. प्रत्येक भारतीय नागरिकाला देशाच्या प्रगतीमध्ये आपली भूमिका समजून एकजुट होण्याची प्रेरणा मिळते. शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये या दिवशी ध्वजवंदनाचा कार्यक्रम आणि विविध सांस्कृतिक कार्यकम आयोजित केले जातात.

happy-republic-day

“प्रजासत्ताक दिनाच्या गोड शुभेच्छा संदेश आणि विचार”

happy-republic-day

“देशभक्ती म्हणजे केवळ एका छोट्या कारणासाठी बलिदान देण्याचा अधिकार. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“स्वर्गापेक्षाही प्रिय आमच्या भारत देशाला! विविध जाती आणि संस्कृती असलेल्या आपल्याला एकच धागा बांधतो – आपण सारे एक आहोत.”

“गांधीजींचा स्वप्न सत्यात उतरला आणि म्हणूनच आपल्या देशाने गणराज्य बनवले.”

“भारत माता, तुझ्या पायाशी कोटी वंदन! तुझ्या रक्षणासाठी आम्ही काहीही करण्यास तयार आहोत.”

“सीमेवर जवान आपल्या प्राणाची आहुती देतात; आम्ही पण त्याचप्रमाणे आपल्या देशाच्या संविधानाचे रक्षण करूया.”

“गणतंत्र दिवस म्हणजे फक्त एक दिवस नाही, तर त्याच दिवशी आपल्या देशात मोठे बदल घडले आहेत. जर तुम्हाला गणराज्य दिनाचे महत्त्व माहिती नसेल, तर आजच जाणून घ्या.”

“तुम्ही तुमचा वाढदिवस विसरू शकता, परंतु 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी कधीच विसरू नका. हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत.”

happy-republic-day

happy-republic-day

“प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा: स्वातंत्र्य आणि एकतेचा उत्सव”

happy-republic-day

happy-republic-day

सलाम करा या तिरंग्याला 
जी तुमची शान आहे… 
मान नेहमी वर उंच ठेवा 
जो पर्यंत प्राण आहे…
जय हिन्द, जय भारत

happy-republic-day