गुढीपाडवा हा महाराष्ट्रात उत्साहाने साजरा केला जाणारा महत्त्वाचा सण आहे, जो हिंदू नववर्षाचा प्रारंभ दर्शवतो. हिवाळ्याचा शेवट आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीचे प्रतीक असलेला गुढीपाडवा हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. याला ‘युगादि‘ असेही म्हणतात, कारण या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली अशी श्रद्धा आहे.

गुढीपाडव्याला घराच्या प्रवेशद्वारावर गुढी उभारून त्यावर रेशमी वस्त्र, साखरेची माळ, कडुलिंबाची पाने आणि फुलांचा हार बांधला जातो. गुढी ही विजयाचे, समृद्धीचे आणि नवी ऊर्जा मिळण्याचे प्रतीक मानली जाते. हा सण प्रत्येक घराघरात स्वयंपाकाच्या विशेष पदार्थांनी, खास करून पुरणपोळी, गुळ-चणेसह साजरा होतो.

गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन सुरुवात करण्याचे महत्त्व मानले जाते; व्यवसाय, शेती, आणि शिक्षणातील नवीन संकल्प ह्या दिवशी सुरू करण्याची परंपरा आहे. गुढीपाडवा हा सण केवळ नववर्षाचे स्वागत करणारा नाही, तर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचे दर्शनही घडवतो.

gudipadwa

“गुढी पाडवा विशेष – मराठीतून नवीन वर्षाच्या शुभेच्छा”

gudipadwa

नववर्ष आला आता आपला फळांचा राजा पण येणार
मग तयार व्हा आणि नववर्षात ताव मारायला 
नववर्षाच्या आंबामय शुभेच्छा !!

वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष 
सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष
नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा !!

gudipadwa

लांब असू आपण या वर्षीही नाही होणार गाठीभेटी
तरी गुढी उभारताना आईबाबा नक्कीच होईल इमोशनल तुमची बेटी 
मिस यू आईबाबा…गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा

gudipadwa

नव्या वर्षात होऊ दे मनाला नव्या विचारांचा स्पर्श, नवे वर्ष मग आणेल आयुष्यात नवा हर्ष..नववर्षाभिनंदन.

घरात आला आहे शुभ संदेश, गुढीचा करून वेष आले आहे नववर्ष, नववर्षाभिनंदन. 

नव्या वर्षाची करा दमदार सुरूवात आणि लिहा नव्या इतिहास. 

एक ताजेपणा, एक नाविन्य नवीन वर्षात करू काही नाविन्यपूर्ण…नववर्षाच्या शुभेच्छा. 

जुन्या आठवणींचं गाठोडं बांधून 
पाहूया नववर्षाची वाट
जे आणेल आनंदाची बहार
अशी गुढीपाडव्याची परंपरागत सुरूवात
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 

नव दुर्गांच्या आगमनाने सजते नववर्ष
गुढी उभारल्याने बहरते हे नववर्ष
कोकिळा म्हणते नववर्षाचा मल्हार
निसर्गाच्या संगीताला येतो आकार
चैत्राच्या सुरूवातीने होतो नवआरंभ
हाच आहे हिंदू नववर्षाचा प्रारंभ
हॅपी गुडी पाडवा

gudipadwa

gudipadwa

आली आहे बहार नाचूया गाऊया
एकत्र येऊन आनंद साजरा करूया
निसर्गाची किमया अनुभवूया
एकमेंकाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया