gora-kumbhar-mandir-tare

गोरा कुंभार मंदिर तेर उस्मानाबाद पासून २२ कि.मी. अंतरावर असलेल्या तेर या गावी प्राचीन संस्कृतीच्या पाउलखुणा आजही स्पष्ट जाणवतात.
प्राचीन काळात प्रदेशासी व्यापार संबंध असलेले तेर हे गाव प्रख्यात राष्ट्रीय संत गोरोबाकाका कुंभार यांच्यामुळे महाराष्ट्रला ज्ञात आहे. या गावात जुने राहते घर असून तेरणा नदीच्या काठावर त्यांची समाधी असलेले मंदिर आहे.
तर येथील कांही मंदिरे स्थापत्यशास्त्राच्या बांधकामामुळे प्रसिद्ध आहेत. गावाच्या आग्नेय दिशेला श्री नृसिंहाचे एक जुने मंदिर आहे. तर गावच्या मध्यभागी त्रिविक्रमाच्या भव्य अशा मूर्ती समोर विष्णूची मूर्ती आहे.