जो जो जो जो रे गजवदना । मयुरेश्‍वर सुखवदना ।


निद्रा करि बाळा एकरदना । सकळादी गुणसगुणा ॥धृ॥


गंडस्थळ शुन्डा ते सरळी । सिदुंर चर्चुनि भाळी ।

ganpati-palana


कानी कुंडले ध्वजजाळी । कौस्तुभ तेज झळाळी ॥१॥


पालख लावियला कैलासी । दाक्षयणिचे कुशी ।


पुत्र जन्मला हॄषकेशी । गौरिहाराचे वंशी ॥२॥


चौदा विद्यांचा सागर । वरदाता सुखसागर ।


दुरिते निरसिली अपार । विष्णूचा अवतार ॥३॥


लंबोदर म्हणता दे स्फुर्ति । अद्‍भुत ज्याची किर्ती ।


जीवनसुत अर्ची गुणमुर्ती । सकळिक वांछा पुरती ॥४॥