गणपतीची आरती
ganpati-aarti-vedashastranmaji-tu-mangalmangal
|| वेदशास्त्रांमाजी तूं मंगल ||
वेदशास्त्रांमाजी तूं मंगलमूर्ती।
अगणित महिमा तुझा कल्याण स्फ़ूर्ती॥
भक्तांलागी देसी विद्या अभिमत ती।
मोरेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती॥१॥
जय देव जय देव जय मोरेश्वरा।
तुझा न कळे पार शेषा फ़णिवरा॥धृ.॥
पुळ्यापश्ये नांदे महागणपती।
माघ चतुर्थीला जनयात्रे येती।
जें जें इच्छिति तें तें सर्वही पावती।
जय देव जय देव जय मोरेश्वरा॥२॥
एकवीस दुर्वांकुरा नित्ये नेमेसी।
आणूनि जे अर्पिती गणराजयासी॥
त्याचे तू भवबंधन देवा चुकविसी।
विठ्ठलसुत हा ध्यातो तुझिया चरणासी॥
जय देव जय देव जय मोरेश्वरा॥३॥