गणपतीची आरती
ganpati-aarti-uth-uth-ray-uth-ganaraya
|| उठ उठ रे उठ गणराया ||
उठ उठ रे उठ गणराया तुज आवडता, मोदक घे खाया॥ध्रु॥
पुर्वेस तिष्ठली सूर्याची किरणे दव ओली झाली दुर्वांची कुरणे
तुझविन जास्वंदी रुसली रे फुलाया उठ उठ रे उठ गणराया॥१॥
बघ आकाशी चंद्र गेला विलयाला तुझ ओवाळीत ये रवी उदयाला
उठ उठ रे उठ जगाचे तम साराया उठ उठ रे उठ गणराया॥२॥
तुज संगे खेळाया जमले बघ रे गण भावे आनंदे उत्सवती तुझाच रे
सण ह्या भक्तांची दु:खे ने विलयाला उठ उठ रे उठ गणराया॥३॥