गणपतीची आरती
ganpati-aarti-suckle-kalancha-udgata
|| सकल कलांचा उद्गाता ||
सकल कलांचा उद्गाता गुणेश गजानन भाग्यविधाता॥ध्रु॥
प्रथम पूज्य हा शिवगौरीसुत गणनायक शुभदायक

दैवत या विश्वाचा त्राता विनायक या विश्वाचा त्राता॥१॥
आदिदेव ओंकार शुभंकर मी नतमस्तक या चरणांवर
तू विद्येचा दाता गजमुखा तू विद्येचा दाता॥२॥