गणपतीची आरती

ओंवाळू आर्ती देवा श्रीमंगलमूर्ती

अघसंकट नासुनियां द्यावी चरणांसी मुक्ती॥धॄ.॥जय॥

देवा तूं आद्य सुरवरवंद्या गणराया

तुझीया स्वरुपी न सरी पावे दुसरी उपमाया॥१॥

शेंदूर अंगी चर्चुन कंठी मुक्तांची माळा।

लंबोदर उंदीरवर शोभे लल्लाटी टीळा॥२॥

ganpati-aarti-ovalu-arti-deva

पीतांबर परिधान पायी घुंगुरध्वनि गाजे।

दुर्वांकुर वाहिले आम्ही भक्तीचे काजे॥३॥

वार्षिक उत्साहाची सेवा यथाशक्ति केली।

न्यूनाधिक तें क्षमा करुनि रक्षी माउली॥४॥

महानैवेद्य घृतशर्करा्मिश्रीत हे लाडू।

अर्पू तुजला प्रसाद आपुल्या पात्री तो वाढूं॥५॥

पिता तुझा तो सांब सदाशिव ध्यातो।

श्रीरामा हनुमंतानें त्याचे पायी धरिला सुप्रेमा॥६॥