गणपतीची आरती

झाली पूजा उजळुं आरती ॥ भक्तिभावें पुजा करुं विघ्नेशीं ॥

पूजेचा आरंभ करितो दुसरी ॥ कैसी पूजा तुझी नकळे अंतरीं ॥१॥

जयदेव जयदेव जय (श्री) मंगलमूर्ती ॥ भक्तिभावें तुझें चरण हृदयीं ॥जयदेव ॥धृ॥

ganpati-aarti-jhali-puja-ujalu-aarti

उजळीले दीप मनोमानसीं ॥ सुखें निद्रा (मोरया) करी तूं मंगलमूर्ती ॥

पूर्व पूण्य माया रचिली कुसरी ॥ भक्तिभावें तुज धरिले अंतरीं ॥जयदेव॥२॥

प्रपंचाची गती न कळे लौकीकीं ॥ किती भोग भोगूं विपरीत ध्याती ॥

म्हणुनी तुज शरण येतों (आलों) प्रतिमासीं ॥ ऐसा भक्तिभाव निरोपी तूजसीं ॥जयदेव ॥३॥

समर्थासीं बोलणें नकळे मानसीं ॥ ऐसा सदोदीत देखिला भक्तिसीं ॥

मोरया गोसावी ह्मणे तुजसीं ॥ टाकिले वनवासी कवणाचे द्वारीं ॥जयदेव ॥४॥

अर्चन करुनि तुह्मा केली आरती ॥ सूखें निद्रा (मोरया) करी तूं मंगलमूर्ती ॥

जय देव जयदेव जय(श्री) मंगलमूर्ती ॥ भक्तिभावें तुझें चरण हृदयीं ॥जयदेव॥५॥