गणपतीची आरती
ganpati-aarti-jay-dev-jay-dev-jay-ganapati-deva
|| जय देव जय देव जय गणपती देवा ||
जय श्रीगणेशा गणपति देवा, आरती मी करितो ।
मोरया आरती मी करितो । भक्तां संकटी पावुनी सकला प्रसन्न तू होतो ॥ धृ. ॥
भाद्रपद मासी शुक्ल चतुर्थी, पार्थिव तुझ करिती ।

मोरया पार्थिव तुझ करिती ॥ भक्तां पावुनि अंती तयाला मोक्षाला नेसी ॥ १ ॥
नानापरिची द्रव्ये पुष्पें, तुजला अर्पिती । मोरया तुजला अर्पिती ।
मोदक आणिक रक्तफुलांवरी किती तुझी प्रिती ॥ २ ॥
भक्त रक्षणासाठी देवा, अष्टस्थानीं प्रकटशी ।
मोरया अष्टस्थानीं प्रकटशी ॥ तू मायेची फुंकर घालुनी, तयांस उद्धरशी ॥ ३ ॥
स्थावर क्षेत्री पंचदेवता, तुजला प्रार्थीती । मोरया तुजला प्रार्थीती ॥
प्रसन्न होऊनी तू त्या स्थानी, मोरेश्वर होसी ॥ ४ ॥
थेऊर क्षेत्रीं भक्त तुझे बहु, चिंता ते करिती । मोरया चिंता ते करिती ।
चिंता हरिशी म्हणुनी गणेशा चिंतामणि म्हणती ॥ ५ ॥
पल्लव क्षेत्री भक्त चिमुकलें, तुजला पूजिती । मोरया तुजला पूजिती ॥
प्रसन्न होऊनी तू त्या स्थानी, बल्लाळेश्वर होसी ॥ ६ ॥
दत्तात्रेय सुत विनवितसे चरणी । मोरया विनवितसे चरणी ॥
सर्व जनाते संकटी रक्षी, हीच असे विनवणी ॥ ७ ॥