गणपतीची आरती
ganpati-aarti-heramba-arambha-vandan-vighnesh
|| हेरंबा आरंभा वंदन विघ्नेशा ||
हेरंबा आरंभा वंदन विघ्नेशा शिवसुता मज तुझी
कृपाभिलाषा अष्टौप्रहरी चित्ती तव नामघोषा नतमस्तक श्रीचरणी भक्त सर्वेशा॥१॥
जय देव जय देव जय बुद्धीदाता ओवाळू आरती विश्वाच्या नाथा || जय देव||॥ध्रु॥

साजिरी गोजिरी मोहक मुर्ती चराचराची चैतन्यस्फुर्ती
गजमुख ज्ञानेश्वरा तू इच्छापुर्ती अंतरी उधाण मांगल्यभरती जय देव जय देव जय
बुद्धीदाता ओवाळू आरती विश्वाच्या नाथा || जय देव||॥२॥
विराजे मंचकी आदी अंतिमा चतुर्भुज सुशोभित प्रतिमा तेजाने
ओजाने दग्ध काळिमा दिव्यप्रभांकीत मुखचंद्रमा जय देव जय देव जय
बुद्धीदाता ओवाळू आरती विश्वाच्या नाथा || जय देव||॥३॥
वक्रतुंडाहाती मोदक ज्ञानाचा परशू करी नाश अवघ्या
विघ्नांचा हर्ता अंकुश धारी षडरिपूंचा शुभाय आशिष देई
सौख्याचा जय देव जय देव जय बुद्धीदाता
ओवाळू आरती विश्वाच्या नाथा || जय देव||॥४॥