गणपतीची आरती

तूं सुखकर्ता तूं दुःखकर्ता विघ्नविनाशक मोरया ।
संकटीं रक्षीं शरण तुला मी, गणपतीबाप्पा मोरया ॥ ध्रु ॥

मंगलमूर्ति तूं गणनायक ।
वक्रतुंड तूं सिद्धिविनायक ॥


तुझिया द्वारीं आज पातलों ।
नेईं स्थितिप्रति राया ॥ संकटीं॥१॥

ganapati-aarti-tu-sukhakarta-tu-duhkhakarta

तूं सकलांचा भाग्यविधाता ।
तूं विद्येचा स्वामी दाता ॥


ज्ञानदीप उजळून आमुचा ।
निमवीं नैराश्याला ॥ संकटीं ॥२॥

तूं माता, तुं पिता जगं या ।
ज्ञाता तूं सर्वस्व जगीं या ॥


पामर मी स्वर उणें भासती ।
तुझी आरती गाया ॥ संकटीं ॥३॥