गणपतीची आरती
ganapati-aarti-shivtanya-aji-de-matila
|| शिवतनया आजि दे मतिला ||
शिवतनया आजि दे मतिला ॥
आरती तुजला करिन मी भावें ।
वर दे तू मजला ॥ १ ॥

संकटनाशक बुद्धिप्रकाशक।
नमितों मी तुजला ॥२॥
सिंदुरचर्चित शुंड विराजित।
मुषकावरि बसला ॥ ३ ॥
मंगलदायक नाम तुझे मुखी ।
जपतां हरिं तरला ॥ ४ ॥