गणपतीची आरती
ganapati-aarti-jay-jay-ganapati-aghashamana
|| जय जय गणपति अघशमना ||
जय जय गणपति अघशमना । करितों आरती तव चरणा ॥ धृ ॥
छळिती षडरिपु बहु मजला। यांतुनि तारी जगपाला ॥
हरि या विविध तापाला। दॆन्यहि नेई विलयाला ॥
निशिदिनि करि मज साह्याला । विनंति ही तव पदकमला ॥
विठ्ठलसुत बहु प्रेमे विनवी तारी या दीना ।
दयाळा करिं मजवरि करुणा ॥ जय. ॥ १ ॥
जय जय गणपति अघशमना । करितों आरती तव चरणा ॥ धृ ॥