गणपतीची आरती
ganapati-aarti-gajavadana-pujuni-tula-karit
|| गजवदना पुजूनी तुला करित ||
गजवदना पुजूनी तुला करित आरती।
तारी मला षड्रिपु हे नित्य पीडीती॥धृ॥
अति सुंदर रत्नमाळा कंठि शोभती।
ऋद्दिसिद्धि नायिकादि चमर वारिती॥ इंद्रादिक सुरवरनर नित्य पूजिती।
निशिदिनि मी ध्यातो तुला तारी गणपती ॥१॥
भक्तकामकल्पद्रुम शारदापती।
वर्णिती हे वेद चारी आणखी स्मृती॥
निशिदिनि जे भजति तुला तारिं त्यांप्रती।
वसुदेव लीन पदीं देविभो मती ॥२॥