गणपतीची आरती

आरती त्रिपुरमर्दनाची। वृषभध्वजा उमेशाची ॥ धृ. ॥

वामांकिनी उमा बैसे। सव्यवेष्ठित विघ्नेशें ॥

नंदी भृंगी उभे सरसे। पहाती विचित्रशावेशें ॥ चाल ॥

नेत्री पहा पहा शंभा, चंद्र्सूर्य नमिती रात्रिंचर चरण भद्रक्रर

असती शांतमूर्ति ज्याची। भॊळा वाणी असे साची ॥ १ ॥

ganapati-aarti-aarti-tripuramardanachi

वाणी देवि घरी वीणा। विधीकरि करताल निपुणा ॥

इंदिरा गान रचनपूर्णा। इंद्र पटू वेणुनाद करणा ॥ चाल ॥

धिमिधिमि मृदंगाचा। निशामुखी नाद सांद्र्पटु मंद हरि

करींद्र सुंदरास्य ना केंद्र सर्व लक्षुनि सेविति

विधृति तांडवाची, शंभुला विधृती तांडवाची ॥ २ ॥

नंदी वाहन असें द्वारी। घेती दर्शन नरनारी ॥ नमितां त्रिविधताप सारी।

सुरवर उमेश कामारी ॥ चाल ॥

बोरवेष्यिलासे गणे, बाण डमरूधर, भव्यगौरिहर, प्राशीजो जहर

शांती जो करि अमराची, नमितो तुजला गजाननजी ॥ ३ ॥