तीर्थक्षेत्र

सिद्धी आणि बुद्धी देणारी, तसेच भुक्ति आणि मुक्ती प्रदान करणारी देवी धनदाईची महती खूप मोठी आहे. ती देवी नेहमी मंत्र, यंत्र आणि मूर्तीतून प्रकट होते. भक्तांनी सन्मानपूर्वक तिची पूजा केली पाहिजे.

पुरातन काळात त्रिदेव – ब्रह्मा, विष्णू, आणि महेश यांची उपासना करून काही दैत्यांनी अनेक इच्छित वरदानं मिळवली. त्यांपैकी अर्जिक्य नावाचा एक दैत्य सातपुडा परिसरात मोठा अत्याचारी बनला. त्या दैत्याने स्थानिक जनतेवर प्रचंड अत्याचार सुरू केले.

dhandai-mata-mhasadi

जनतेला त्याच्या त्रासातून वाचण्यासाठी परमशक्तीची अर्थात आदिशक्तीची प्रार्थना करावी लागली. भक्तांच्या या प्रार्थनेमुळे आदिशक्ती खानदेशात धनदाई, सप्तश्रृंगी, म्हाळसा, एकक्णी, चिराई, भटाई आणि रेणुका अशा सप्तभगिनींच्या रूपात अवतरली.

सप्तभगिनींनी त्या दैत्यांना युद्धात हरवण्यासाठी आव्हान दिलं. या युद्धात तुफान संघर्ष झाला आणि शेवटी दैत्यांचा पराभव झाला. पळून गेलेल्या दैत्यांनी रेड्याचं रूप धारण करून वेगवेगळ्या जंगलात लपून बसण्याचा प्रयत्न केला. मात्र सप्तभगिनींनी त्यांचा पाठलाग करून, ज्या ठिकाणी ते लपले होते त्या जंगलात जाऊन त्यांचा नाश केला. या भगिनींमध्ये “धनदाई” आदिशक्तीचं स्वरूप धारण करून अवतरली आणि रेड्याच्या रूपात लपलेल्या दैत्याचा अंत केला.

कालांतराने, भामरे किल्ल्यावर वास्तव्यास असणारे देवरे कुलातील मराठे गुरे पाळण्याचं काम करीत असत. मात्र किल्ल्याचा पाडाव झाल्यानंतर, देवरे कुटुंब विखुरलं आणि आज जिथे धनदाई देवीचं मंदिर आहे त्या स्थळी ते राहायला आले. या ठिकाणी त्यांनी नायगाव नावाचं गाव वसवलं.

दृष्टांतानुसार, त्यांनी कुलरक्षणासाठी धनदाई देवीची स्वयंभू मूर्ती शोधून ती स्थापित केली. देवीची स्थापना करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्याकडे असलेली संपत्ती त्या जागेत जमिनीत पुरली आणि त्यावर देवीची स्थापना केली.

काही वर्षे नायगावात वास्तव्य केल्यानंतर, जंगली प्राण्यांचा उपद्रव, पाण्याची टंचाई आणि दरोडेखोरांच्या त्रासामुळे त्यांनी तेथून स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. ते म्हैसपाडा (आजचं म्हसदी) या नदीपलीकडील ठिकाणी स्थलांतरित झाले. त्यावेळी धनदाई देवीच्या मूर्तीला शेंदूर लावण्याची प्रथा होती.

वर्षानुवर्षे शेंदूर लावल्यामुळे मूर्ती पूर्णपणे शेंदरात झाकली गेली आणि पुढच्या पिढ्यांना मूर्ती आहे हे लक्षातही आलं नाही. कालांतराने, हे जागृत देवस्थान दुर्लक्षित झालं आणि त्या जंगलात राहणाऱ्या भिल्ल लोकांनी त्याची काळजी घेण्यास सुरुवात केली. आजही म्हसदी गावाजवळ दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गरम्य वातावरणात, हे देवस्थान भक्तीचं प्रतिक म्हणून उभं आहे.

धनदाई देवीच्या अवताराची कथा अत्यंत अद्भुत आहे. देवरे कुळातील लोकांनी, ज्या स्थानी आज धनदाई देवीचे मंदिर आहे, त्या ठिकाणी येऊन वास्तव्य केले. कुलाच्या रक्षणासाठी त्यांनी तेथे आदिशक्ती धनदाई देवीची स्वयंभू मूर्ती स्थापन केली. नायगावात काही वर्षे राहिल्यानंतर, जंगली प्राण्यांचा त्रास, पाण्याची टंचाई आणि दरोडेखोरांची भीती यामुळे त्यांनी त्याकाळी नदीच्या पलिकडे असलेल्या म्हैसपाडा, म्हणजेच आजच्या म्हसदी गावात स्थलांतर केले.

त्या काळात देवीच्या मूर्तीला शेंदूर लावण्याची परंपरा होती. पिढ्यान्‌पिढ्या देवीच्या मूर्तीला शेंदूर लावत राहिल्यामुळे मूर्ती पूर्णपणे शेंदरात झाकली गेली, आणि पुढील पिढ्यांना त्या मूर्तीचे अस्तित्वच ज्ञात झाले नाही. कालांतराने, हे देवस्थान दुर्लक्षित झाले आणि स्थानिक भिल्ल जमात या स्थळाची काळजी घेऊ लागली.

सर्व काही असेच चालू असताना, १९६४ साली, देवीने आपल्या चमत्काराने हे विस्मृतीत गेलेले देवस्थान पुन्हा भक्तांच्या नजरेत आणले. साक्री येथील पोस्टमास्तरांची पत्नी, सौ. प्रमिला कुलकर्णी, यांच्या अंगात अचानक देवीचा संचार झाला. धनदाई देवी त्यांच्या स्वप्नात वारंवार येऊ लागली.

या अनुभवांनंतर, देवीच्या दर्शनासाठी त्या स्वतःच प्रेरित होऊन म्हसदी गावात आल्या. मंदिरात पोहोचल्यावर त्यांच्या अंगात देवीचा संचार झाला आणि त्या देवीच्या मंदिराकडे धावतच गेल्या. त्यांच्या या धावण्याचे दृश्य पाहून गावातील लोक देखील त्यांच्या मागे मंदिरापर्यंत गेले.

देवीच्या मूर्तीसमोर पोहोचताच, सौ. प्रमिला कुलकर्णी यांनी देवीची ओढून मिठी घेतली. यावेळी अचानक मूर्तीवरील शेंदूर निघून गेला आणि देवीची कोरीव मुकुटधारी मूर्ती प्रकट झाली. भक्तांनी ते दृश्य पाहून देवीचे दर्शन घेतले. शेंदूर काळजीपूर्वक काढल्यानंतर देवीची सुंदर, साडेतीन फूट उंचीची कोरीव मूर्ती स्पष्टपणे प्रकट झाली, आणि भक्तांनी मोठ्या आनंदाने तिचे पूजन केले.

या प्रकारानंतर धनदाई देवीचे हे जागृत देवस्थान पुन्हा एकदा भक्तांच्या श्रद्धास्थानाचे केंद्र बनले.

इ.स. १९६४ मध्ये धनदाई देवीने एक असा चमत्कार दाखविला, ज्यामुळे दुर्लक्षित झालेले हे देवस्थान पुन्हा भक्तांच्या नजरेत आले. जसे अस्ताला गेलेला सूर्य पुन्हा उदयास येतो, तसेच हे जागृत देवस्थान पुन्हा प्रतिष्ठित झाले. या काळात घडलेली घटना फार विलक्षण होती.

माझे वडील, कै. प्रभाकर मार्तंड कुलकर्णी (लामकानीकर), नंदुरबार येथे पोस्टमन म्हणून काम करत होते. माझी आई, सौ. प्रमिला प्रभाकर कुलकर्णी, त्या काळात नाक आणि कानाच्या गंभीर आजाराने त्रस्त होती. अनेक वैद्य आणि हकीमांचे उपचार करूनही त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नव्हती.

या काळात आईला स्वप्नात वारंवार एक बाई दिसत होती, जी डोक्यावर मोठा दगड घेऊन चालत असायची. सुरुवातीला याचा अर्थ कळत नव्हता, पण काही दिवस असेच जात राहिले, आणि आईचा आजार दिवसेंदिवस वाढतच गेला. स्वप्नांमध्ये तीच बाई पुन्हा पुन्हा दिसत होती.

वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याने, एके दिवशी आई-वडील ‘म्हसदी’ येथे देवीच्या दर्शनासाठी गेले. तिथे गेल्यावर आईला पहिल्यांदा देवीचा संचार झाला. वडील खूप घाबरले होते आणि काय करावे हे समजत नव्हते. त्याच वेळी, आईसाहेबांनी स्वतःची ओळख सांगून देवीची सेवा करण्याचा आदेश दिला. त्या दिवसापासून आमच्या कुटुंबात देवीचा संचार सुरू झाला, जो आजही माझी पत्नी सौ. हेमलता रमेश कुलकर्णी यांच्याद्वारे चालू आहे.

नंतर आई-वडील नंदुरबारला परतले, परंतु स्वप्न आणि संचार तसाच सुरू राहिला. देवीने संचारात स्पष्टपणे सांगितले की, “माझ्यावरचा भार हलका करा, मला मुक्त करा.” एके दिवशी वडिलांनी संचारात विचारले, “स्वप्नाचा अर्थ काय? कोणता भार आहे?” त्यावर देवीने शेंदूर काढण्याची सूचना दिली.

वास्तविक, त्या वेळी म्हसदीतील देवीची मूर्ती पूर्णपणे शेंदूरात झाकलेली होती, आणि गावकरी तिला देवी म्हणून पूजत होते.

वडिलांना बरेच प्रश्न पडले होते—शेंदूर काढल्यावर मूर्ती सापडली नाही तर काय? गावकऱ्यांची प्रतिक्रिया काय असेल? यामुळे त्यांना लगेच काही निर्णय घेणे कठीण वाटले. मात्र, काही दिवसांनी वडिलांना साक्री येथे बढती मिळाली, आणि तिथे त्यांची बदली झाली. साक्री हा गाव माझ्या आजोबांचे मूळ गाव असल्यामुळे त्यांना ते ठिकाण सोयीचे वाटले.

साक्रीत आम्ही बाजारपेठेतील श्रीराम मंदिराजवळ भाड्याने घेतलेल्या घरात राहायला लागलो. त्यावेळी श्री. बाबूराव चंद्रात्रे नावाचे ज्योतिषी आमच्या घराजवळ राहत होते, आणि ते एक कुशल दगडी शिल्पकारही होते.

वडिलांनी त्यांच्याशी देवीच्या मूर्तीबद्दल चर्चा केली. चंद्रात्रे यांनी म्हसदीला जाऊन पाहणी केली आणि काही काळानंतर, सर्वांच्या सहमतीने, देवीच्या मूर्तीवरील शेंदूर काढण्याचा निर्णय घेतला.

एका रविवारी आम्ही सर्वांनी देवीची आरती करून मार्गदर्शन मागितले. त्यावेळी आईसाहेबांनी आनंदाने सांगितले की, देवीची मूर्ती सापडेल आणि संपूर्ण गाव त्याचा साक्षीदार होईल.

धनदाई मातेचे पवित्र मंदिर साक्री तालुक्यातील म्हसदी गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही धुळे किंवा साक्रीमार्गे जात असाल, तर राष्ट्रीय महामार्ग ६ (NH-6) वरून या गावात पोहोचू शकता. म्हसदी हे साक्रीपासून जवळपास २० किलोमीटर अंतरावर आहे.