दत्ताची आरती

विडा घेई नरहरिराया ।
धरूनी मानवाची काया ।
यतिवेष घेउनीयां वससी दीनांसी ताराया ॥ धृ. ॥

ज्ञान हें पूगीफळ ।
भक्त नागावल्लींदळ

datta-aarti-vida-ghei-narahariraya


वैराग्य चूर्ण विमळ ।
लवंगा सत्क्रिया सकळ ॥ विडा॥ १ ॥


प्रेम रंगीत कात ।
वेला अष्टभावसहीत


जायफळ क्रोधरहीत ।
पत्री सर्व भूतहीत ॥ विडा॥ २ ॥


खोबरें हेचि क्षमा ।
फोडुनि द्वैताच्या बदामा ।


मनोजय वर्ख हेमा ।
कापूर हे शांतिनामा ॥ विडा॥ ३ ॥


कस्तुरी निरहंकार ।
न मिळती हे उपचार ॥


भीमापौत्र यास्तव फार ।
सत्वर देई वारंवार ॥ विडा॥ ४ ॥