दत्ताची आरती

नृसिंहसरस्वती । मनि धरुनियां प्रीती ॥
ओवाळीतों शेजारती । अंगीकाराया श्रीपती ॥ धृ. ॥

ब्रह्मा येउनि देव देवा । म्हणे कोण कोण जीवा ॥
उपजवूं कोठे केव्हां । संदेश हा मज व्हावा ॥ नृसिंह॥ १ ॥

datta-aarti-nrisimhasaraswati-mani-dharuniyan

विष्णुही येऊनीयां । आज्ञा मागे वंदुनियां ।
कोण जीवा काय । खाया कैसे देऊं कवणे ठाया ॥ नृसिंह॥ २ ॥

येऊनियां महादेव । वंदूनीया पादद्वंद ॥
ज्ञान कोणा देऊं देवा । आज्ञा करा स्वयमेवा ॥ नृसिंह॥ ३ ॥

अंबा म्हणे बाळ यती । फार झाली असे राती ।
झोंप आलीं तुजप्रतीं । भक्त रक्षुनी श्रम होती ॥ नृसिंह ॥ ४ ॥

विनविती भक्तवृंद । सेवा घेउनिया छंद ॥
पुरवुनि दे ब्रह्मानंद ॥ भीमाप्रौत्रानंदकंद । नृसिंह॥ ५ ॥