दत्ताची आरती
datta-aarti-jayjay-sridattaraj-hi-panchara
|| जयजयजी श्रीदत्तराज ही पंचारति मी तव चरणा ||
जय देव जय देव जय अवधूता ।
अगम्यें लीला स्वामी त्रिभुवनि तुझि सत्ता ॥ धृ. ॥
तुझें दर्शन होतां जाती हीं पापें ।
स्पर्शनमात्रें विलया जाती भवदुरितें ॥
चरणी मस्तक ठेवुनि मनिं समजा पुरतें ।
वैकुंठीचे सुख नाही यापरतें ॥ जय ॥ १ ॥
सुगंधकेशर भाळीं वर टोपीटीळा ।
कर्णि कुंडलें शोभति वक्ष:स्थळि माळ ॥
शरणांगत तुज होतां भय पडलें काळा ।
तुझे दास करिती सेवासोहळा ॥ जय॥ २ ॥
मानवरुपी काया दिससी आम्हांस ।
अक्कलकोटी केंला यतिवेषे वास ॥
पूर्णब्रह्म तोची अवतरला खास ।
अज्ञानी जीवांस विपरीत हा भास ॥ जय॥ ३ ॥
निर्गुण निर्विकार विश्वव्यापक ।
स्थिरचर व्यापुनि अवघा उरलासी एक ॥
अनंत रुपें धरिसी करणें मायीक ।
तुझें गुण वर्णिता थकले विधिलेख ॥ जय॥ ४ ॥
घडता अनंतजन्यसुकृत हें गांठी ।
त्याची ही फलप्राप्ती सद्गुरुची भेटी ॥
सुवर्णताटी भरलीं अमृतरसवाटी ।
शरणागत दासावरि करी कृपादृष्टी ॥ जय॥ ५ ॥