दत्ताची आरती

जय देवा दत्तराया । स्वामी करुणालया ।
आरती ओंवाळीन । तूज महाराज या ॥ धृ. ॥

datta-aarti-jay-deva-dattaraaya-swami-karunal

प्रपंचताट करी । त्रिविधताप निरंजनी ॥
त्रिगुण शुभ्रवाती । उजळि या ज्ञानज्योती ॥ जय. ॥ १ ॥

कल्पना मंत्रपुष्प । भेद दक्षिणा वरी ॥
अहंभाव पूगीफळ । न्यूनपूर्ण सकळ ॥ जय. ॥ २ ॥

श्रीपाद श्रीगुरूनाथा ॥ चरणीं ठेऊनी माथा ॥
विनवितो दास हरी ॥ अवघा त्रास दूर करी ॥ जय. ॥ ३ ॥