दत्ताची आरती
datta-aarti-dehatraya-avatara-tapatraya-haris
|| देहत्रय अवतारा तापत्रय हरिसी ||
देहत्रय अवतारा तापत्रय हरिसी ।
अक्षय सुख अवदुंबर छाये विचरसी ॥
श्रीकृष्णातटिं रहुनि दासा उद्धरिसी ।
जढमूढां तारया अवतार धरिस ॥ १ ॥
जय जय श्रीदत्तात्रय औदुंबरवासी ।
मंगल आरति करितो मम भवभयनाशी ॥ धृ ॥
काय तुझा महिमा वर्णावा आतां ।
मारिसि भूतसमंधा सक्रोधें लाता ॥
नानारोग दुरत्वय तव तीर्थ घेतां ।
पुनरपि श्रवण न ऎकति गदरिपुची वार्ता ॥ जय ॥ २ ॥
तुझें क्षेत्र मनोहर या अवनीवरती ।
त्यातें पहातां वाटे स्वर्गासम धरती ॥
आनंदे द्विज भारत पारयण करिती ।
त्रिकाळ सप्रेमानें करिती आरती ॥ जय॥ ३ ॥
मी अधसागर तूं हो अगस्तिऋषि देवा ।
प्राशूनि वारी दे मज त्वत्पदिंचा ठेवा ॥
बाधों ना मज किमपि प्रापंचिक हेवा ।
दास म्हणे हे बाळक आपुल्या पदिं ठेवा ॥ जय ॥ ४ ॥