दत्ताची आरती

आरती ओवाळूं श्रीगुरु दत्तराज स्वामी ।
शरण आलो तुला देवा भक्तीने हा मी ॥ धृ. ॥

तारीं तारीं स्वामी आतं बुडतो भवडोहीं ।
अहंभाव जाळुनि माते कृपेने पाही ॥ १ ॥

datta-aarti-arati-ovalu-sriguru-dattaraja-swa

शुद्धभाव देऊनि मज लावीं तव भजनीं ।
प्रपंची त्रासलो यांतुनि काढावे क्षणीं ॥ २ ॥

तवगुणलीळा नित्यनिरंतर ऎकवी श्रवणी ।
हाची वर मजला द्यावा श्रीगुरुमूर्तीनीं ॥ ३ ॥

मोरेश्वरसुत वासुदेव हा करितो तव सेवा ।
स्वामि समर्था देई यांसी भक्तीचा ठेवा ॥ ४ ॥