भजन करी महादेव-संत जनाबाई

भजन करी महादेव ।
राम पूजी सदाशिव ॥१॥


दोघे देव एक पाहीं ।
तयां ऐक्य दुजें नाहीं ॥२॥

bhajan-kari-mahadeva-sant-janabai


शिवा रामा नाहीं भेद ।
ऐसे देव तेही सिद्ध ॥३॥


जनी म्हणे आत्मा एक ।
सर्व घटीं तो व्यापक ॥४॥