दत्ताची आरती
arati-datta-onvalu-data
|| आरती आरती दत्त ओंवाळू दाता ||
आरती आरती दत्त ओंवाळू दाता ।
स्वामी ओंवाळूं दाता ।
आरतीचें हरण दत्तें केले तत्वत्तां ॥ धृ. ॥

आरती खुंटली आतां ओंवाळूं कैसे ।
स्वामी ओंवाळूं कैसे ॥
तरी भजन निरंजनी नित्य होतसे ॥ आरती ॥ १ ॥
आरतीचे आर्त पुरविले श्रीदत्ते ।
एकाजनार्दनी सहज ओंवाळींतसें ॥ आरती॥ २ ॥